चित्रा न्युज ब्युरो
बीड : वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तय्यब जफर आणि बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पुरोषत्तम वीर यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील एमआयएम पक्षाचे जिल्हा सचिव, शहर सचिव यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मोहम्मद पैगंबर बिल यास प्रभावित होऊन आपल्या कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे.
बीड जिल्हा सचिव अन्वर पठाण, शहर सचिव रेहमत पठाण, जमीर शेख, हारून शेख, रौफ शेख, सईद अकबर, अदील शेख, मोमीन फारूक, उमर खान, अजमल शेख यांच्यासह अनेक एमआयएम कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मुस्लिमांच्या प्रतीची भूमिका ही न्याय देणारी असून, इथल्या अल्पसंख्याकांना वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नसल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी मुस्लिम उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहेत. ही त्यांची भूमिका आम्हाला न्याय देणारी आहे. मुस्लिम समाजाला जेव्हा जेव्हा धर्माच्या नावावरून लक्ष केले जाते, तेव्हा प्रकाश आंबेडकर हेच आमच्यासाठी धावून येतात. असेही या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
तय्यब जफर यांनी नाव न घेता एका जिल्ह्यातील एमआयएम कार्यकर्ते माझ्या संपर्कात असून त्यांचाही लवकरात लवकर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेणार असल्याचे सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर राज्यातील मुस्लिम समाजाचा विश्वास असल्याने अनेक मुस्लिम नेते आणि कार्यकर्ते आता वंचित बहुजन आघाडीकडे वळतांना दिसत आहेत.
---


0 टिप्पण्या