चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन मुलींच्या खो-खो स्पर्धेत स्व. वच्छलाबाई मामुलकर प्रशासकीय सेवा महाविद्यालय मुरमाडी/तूप., तालुका लाखनी येथील मुलींनी खो-खो स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. या खो-खो संघात प्रतीक्षा हेमराज दहेलकार, आरती ग्यानीरान आरीकर, अंकिता राजेश लांजेवार, वैशाली तुळसीदास मेश्राम, आशू प्रेमानंद भोवते, दिव्या ज्ञानेश्वर गोंधोळे, प्रियांका ऋषी कठाने, छाया नानाजी कठाने, स्नेहा संजय पोवनकर, खीलेश्वरी हरिदास निरगुळे, करिश्मा केवळराम धोटे, आचल तुकाराम भेंडारकर, छगु गौरीशंकर यांचा समावेश होता.
या शिवाय वयक्तिक भालाफेक मध्ये कुमारी प्रियांका ऋषी कठाने हिने प्रथम क्रमांक तर ४०० मीटर दौड स्पर्धेत कुमारी अर्पिता अंकुश भोयर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. विजयी चमूने यशाचे श्रेय प्राचार्य भोजराम लांजेवार, प्रा. वंदना वाघमारे, प्रा. ज्ञानेश्वर काळे, प्रा. ज्योत्स्ना फुल्लुके, प्रा. सूरज भोयर, प्रा. शिलवंत खोब्रागडे व आई वडिलांना दिले असून स्व. वच्छलाबाई मामुलकर प्रशासकीय सेवा महाविद्यालय मुरामाडी/तूप येथील शिक्षिकेत्तर कर्मचारी व गावकऱ्यांनी या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या