• विरोधी पक्षाचा माजी जिल्हाध्यक्ष लावला गळाला
• रसद पुरवून केले उमेदवार
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- अनुसूचित जाती करिता आरक्षित असलेल्या भंडारा विधानसभा क्षेत्रात सत्तेची चव चाखलेल्या एका पुढाऱ्याने बौद्ध समाजातील मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी विरोधी पक्षाचे एका माजी अध्यक्षाला गळाला लावून त्याला रसद पुरवठा करून विधानसभा रणसंग्रामात उतरविले. पण त्याचा बौद्ध मतांवर कसलाही परिणाम होणार नाही. कारण या इसमाने कधी सामाजिकता पाळलीच नाही. असे शहर वासियांसह भंडारा विधानसभा क्षेत्रात खमंग चर्चांना पेव फूटले असून हे अपक्ष उमेदवार भविष्यात "ना घर के ना घाट के" राहणार असल्याचे बोलले जाते.
परिसीमण आयोगाने २००८ मध्ये भंडारा विधानसभा क्षेत्रातील लोकसंख्येच्या २३ टक्के अनुसूचित जातीची लोकसंख्या असल्याने हे विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीकरिता आरक्षित केले. २००९ पासून या विधानसभा क्षेत्रातून अनुसूचित जाती संवर्गात मोडणारा व्यक्तीच निवडून जातो. या विधानसभेचे कार्यक्षेत्र भंडारा व पवनी तालुका असून मतदार संख्या ३ लाख ७३ हजार ८२८ आहे. त्यात पुरुष १ लाख ८५ हजार ५२९ व महिला १ लाख ८८ हजार २६६ आहे. यावरून पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. या विधानसभा क्षेत्रातून २००९ आणि २०१९ मध्ये अपक्ष तर २०१४ मध्ये भारतीय जनात पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे भंडारा विधानसभा क्षेत्रातील मतदारांकडून अपक्ष उमेदवारांना पसंती दर्शविली जाते. असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
१४व्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत असल्यामुळे निर्वाचन आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. नामनिर्देशन पत्र उचलल्यानंतर १९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून सत्तेची चटक लागलेल्या काही उमेदवारांनी बौद्ध समाजाची मते आपणास मिळणार नाही असे गृहीत धरून विरोधी पक्षातील बौद्ध समाजाच्या एका माजी जिल्हाध्यक्षाला गळाला लावून त्यास रसद पुरवठा करून विधानसभा निवडणुकीत उभे केले असल्याच्या मतदारांत चर्चा होत आहे. या अपक्ष उमेदवाराचे कुटुंबीय पूर्वी ज्या पक्षात होते त्या पक्षात स्थानिक स्वराज्य संस्थांसह पक्ष संघटनेतही अनेक महत्वाची पदे देण्यात आले होती. याचा या अपक्ष उमेदवाराला विसर पडला असल्याचे त्याचे कृती वरून दिसून येते.
हे अपक्ष उमेदवार शहारासह जिल्ह्यात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून गणले जात असले तरी सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचेकडे वर्गणीकडे गेल्यास पावती ठार फाडत होते. पण त्यांनी कधीही अर्थसाहाय्य केले नाही. त्यामुळे समाजातही त्यांचे बाबद चांगली मते मत्तांतरे नाहीत. असे शहर वासीयांचे म्हणणे आहे. या अपक्ष उमेदवाराने पुरोगामी विचारसरणीच्या आघाडीला सोडून बौद्ध समाजाविषयी चांगली विचारसरणी नसलेल्या एका नेत्याच्या तावडीत तो सापडला असून त्याला निवडणूक लढवायचीच होती तर २००९, २०१४ तसेच २०१९ मध्ये ते स्वतः एका राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना विधानसभा निवडणूक का लढली नाही ? त्यांना २०२४ मध्येच विरोधी विचारधारेच्या एका नेत्याच्या भूलथापांना बळी पडून समाजविरोधी ध्येयधोरणे राबविण्याच्या गळाला लागल्यामुळे समाजात आश्चर्य व्यक्त होत आहे. सत्तेची चटक लागलेल्या नेत्यांकडून कोणत्याही प्रकारची कृती करून आपण विधानसभा निवडणूक जिंकलीच पाहिजे असे गृहीत धरून विचारधारेशी तडजोड न करता कुणाचीही मदत घेऊन निवडून येण्याकरिता वाटेल त्या क्लुप्त्या करतात. अशा भंडारा विधानसभेतील मतदारांत चर्चा होत आहेत. ही बाब मतदारांच्या निदर्शनास आली असून यात कुणाची वाट लागेल हे २३ नोव्हेंबर रोजी कळेल.
0 टिप्पण्या