Ticker

6/recent/ticker-posts

आ. नाना पटोले यांनी नारळ फोडून प्रचारास केला शुभारंभ


• हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- ६२ साकोली विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार नाना पटोले यांनी मंगळवार(ता.५ नोव्हेंबर) लाखनी येथील साई मंदिर तथा महाप्रज्ञा बुद्ध विहारात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे रॅलीने सिंधी लाईन स्थित हाजी अहमद शाह दर्गा येथे जाऊन नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र निरीक्षक माजी मंत्री डॉ. शिवकुमार डहरिया, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार अभिजित वंजारी, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहन पंचभाई, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, साकोली विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक डॉ. अजय तुमसरे, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, आरोग्य व शिक्षण सभापती रमेश पारधी, माजी आमदार अनिल बावनकर, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, जिल्हा युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष पवन वंजारी, समाजकल्याण सभापती मदन रामटेके, जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष जयश्री बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) अध्यक्ष यशवंत चानोरे, शिवसेना(उद्धव ठाकरे गट) जिल्हा संघटक लवकुश निर्वाण, भंडारा जिल्हा सेवादल अध्यक्ष कैलास(रणभिर) भगत, जिल्हा उपाध्यक्ष शफी लद्धानी, जिल्हा महासचिव राजू निर्वाण, धनंजय तिरपुडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य आकाश कोरे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष योगराज झलके, पंचायत समिती सभापती प्रणाली सार्वे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष यशवंत खेडीकर, महिला आघाडी अध्यक्ष पुष्पा डुंभरे, जि.प. सदस्य विद्या कुंभरे, मनीषा निंबार्ते, पंचायत समिती सदस्य सुनील बांते, सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर बिसेन, महादेव गायधनी, महाविकास आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) गटाच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह हजारो च्या संख्येत जनता उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या