Ticker

6/recent/ticker-posts

"त्या" रेती माफियास प्रशासनासह लोक प्रतिनिधींचा वरदहस्त

• मरेगाव रेती घाटावरील प्रकार 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
 भंडारा:- लाखणी तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील मरेगाव रेती घाटातून रेतीचा अवैध उपसा व वाहतूक करणाऱ्या स्थानिक कुख्यात रेती माफिया व त्याचे २ सहकाऱ्यांना प्रशासनातील महसूल, खनिकर्म व पोलिस विभागाचा आशीर्वादा पाठोपाठच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याचा वरदहस्त असल्यामुळे कारवाईचे सौजन्य दाखविले जात नाही. तर हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी मरेगाव सीमेत आलेले इतर गावातील ट्रॅक्टर परत पाठवीत असून या पदाधिकाऱ्याचाही एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर रेती तस्करीत लिप्त असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. वरिष्ठ महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची चौकशी करून रेती तस्करी थांबवावी. तसेच तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी कोण ? हे जनतेसमोर आणणे आवश्यक झाले आहे. 
                       चुलबंद नदी मुरमाडी/तूप व पालांदूर परिसराची जीवनदायिनी आहे. या नदीमुळे नदी काठावरील गावातील शेतजमिनीस सिंचनाची सोय तर पाणी पुरवठ्याचे जलस्त्रोत या नदीपात्रात असल्याने अनेक गावात पाणी पुरवठा योजना मार्फत शुद्ध पाणी पुरवठा केला जातो. या शिवाय चुलबंद नदी पात्रातील बारीक व पांढरी शुभ्र रेती असल्यामुळे बांधकाम क्षेत्रात प्रचंड प्रमाणात मागणी आहे. पण रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे रेती तस्करांचा उदय झाला आहे. रेती तस्करीवर प्रतिबंध घालण्याचे काम महसूल व पोलिस विभागासह खनिकर्म विभागाचे असले तरी या विभागातील अधिकारी व स्थानिक कर्मचाऱ्यांना रेती तस्करांकडून महिन्याचे ठराविक दिवशी ठरल्यानुसार चिरीमिरी(हप्ता) उपलब्ध केला जातो. या शिवाय या विभागात रेती तस्करांचे हस्तक असल्यामुळे या विभागाचे पथक पालांदूर परिसरात जाणार असल्याची पूर्व सूचना या रेती तस्करांना मिळत असल्यामुळे पथक जाईपर्यंत रेती तस्करी बंद ठेवली जाते. 
                        मरेगाव रेती घाटातून मरेगाव येथीलच एका कुख्यात रेती तस्करासह त्याचे २ सहकारी ६ विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने रेती तस्करी करीत असल्याची बाब महसूल व पोलिस विभागाला माहिती असताना सद्धा हफ्तेखोरीमुळे कारवाईचे सौजन्य दाखविले जात नाही. यावरून या रेती तस्करांना प्रशासनाच्या आशीर्वादा पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याचाही वरदहस्त असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गौण खनिजाचे संरक्षण करणे हे पदाधिकाऱ्याचे काम आहे. यात दुमत नाही. पण रेती तस्करांशी संगनमत करून रेती तस्करीस प्रोत्साहन देणे हे त्याचे काम नसतांना सुद्धा इतर गावातील ट्रॅक्टरांना अडथळा करून आपले गावातील कुख्यात रेती तस्करांना रेती तस्करीची मुभा देणे. यात कुठेतरी पाणी मुरत असल्याचे दिसून येते. रेती तस्करीबाबद अधिक माहिती घेतली असता या स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्याचा ट्रॅक्टरही रेती तस्करीत लिप्त असल्याचे समजते. संबंधित विभागाने मरेगाव रेती घाटातून होणारी रेती तस्करी थांबवून रेती तस्करांशी संगनमत करून रेती तस्करीत लिप्त असणारा तो स्थानिक स्वराज्य संस्थेचा पदाधिकारी कोण ? हे प्रशासनाने जनतेसमोर आणणे आवश्यक झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या