Ticker

6/recent/ticker-posts

रेती तस्करी थांबविण्यास पोलिस यंत्रणा अपयशी

• मरेगाव रेती घाटातील प्रकार 

• स्थानिक पोलीस, एलसीबी व एसडीओ पथक निद्रिस्त


कालिदास खोब्रागडे,चित्रा न्युज
 भंडारा :-लाखनी तालुक्यातील चुलबंद नदी खोऱ्यातील मरेगाव रेती घाटातून येथीलच एका कुख्यात रेती तस्करासह २ सहकाऱ्यांकरवी ७ विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर द्वारा दिवसाढवळ्या राजरोसपणे अवैध रेती वाहतूक सुरू असून यावर प्रतिबंध लावण्यास स्थानिक पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा भंडारा व उपविभागीय पोलिस अधिकारी पथक अपयशी ठरले असल्याने यात काही अर्थकारण तर झाले नाही ना ? अशा चर्चांना पेव फुटले असून यावरून रेती तस्करी थांबविण्यास पोलिस यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून येते.  
                    चुलबंद नदीमुळे लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्याची सीमा निर्धारित करण्यात आली. असून लाखनी तालुक्यात ७ रेती घाट असून सर्वात शेवटी मरेगाव रेती घाट तर लगत बारव्हा आणि खोलमारा रेती घाट असून हेही रेती घाट लाखांदूर तालुक्याचे शेवटचे टोक असल्यामुळे अधिकारी फिरकत नाही. सध्या विधानसभा निवडणूक कार्यक्रम सुरू असून महसूल विभाग व्यस्त असल्यामुळे रेती तस्करांची चलती आहे. महसूल विभागापाठोपाठ अवैध रेती तस्करीवर प्रतिबंध लावण्याचे अधिकार पोलिस विभागालाही देण्यात आले असून जिल्ह्यात नुकतेच रुजू झालेले पोलिस अधीक्षक नुरुल हसन अवैध व्यवसायावर आळा घालण्याचे सर्व पोलिस ठाण्यांना निर्देश दिले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह उपविभागीय पोलिस अधिकारी स्तरावर विशेष पोलिस पथक तयार करण्यात आले आहे. 
                      मरेगाव येथील एक कुख्यात रेती तस्कर मागील ५ ते ६ वर्षापासून सहकाऱ्यांसह रेती तस्करी करीत असल्यामुळे त्याचे स्थानिक महसूल व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचेसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंधामुळे सदर रेती माफिया इतक्या वर्षापासून रेती तस्करी करीत असताना सुद्धा त्याचेवर एकही केसेस केली गेली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. महसूल किंवा पोलिस पथक येणार असल्याची आधीच माहिती या रेती तस्करास मिळत असल्याने स्थानिक महसूल व पोलिस विभागातील तो "झरीचा शुक्राचार्य" कोण ? याचा शोध घेणे क्रमप्राप्त झाले आहे. 
                     चुलबंद नदी पात्रातील मरेगाव ते बारव्हा पुलाचे बाजूला या रेती माफिया कडून अवैध रेती उत्खनन व ओव्हरलोड रेती वाहतूक सुरू असल्याने गावकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या प्रकाराने मरेगाववासी त्रस्त असून रेती तस्कराने शासनाने ठरवून मापदंडापेक्षा अधिक खोल रेती उपसा केला असल्याने पर्यावरणास हानी पोहचत आहे. तसेच शासनाचा महसूलही बुडत असला तरी या रेती तस्कराशी पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे प्रतिबंध लावण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी या गंभीर बाबीची स्वतः दखल घेऊन मरेगाव रेती घाटातून दिवसाढवळ्या होणाऱ्या रेती तस्करीवर प्रतिबंध लावणे आवश्यक झाले आहे. 


तक्रारीस केराची टोपली
मरेगाव रेती घाटातून अवैध रेती उपसा व वाहतुकीमुळे गावकरी त्रस्त असून रेती वाहतुकीवर प्रतिबंध लागावा. या करिता काही सुज्ञ नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेल्या तक्रारपेटीत २ आठवड्यापूर्वी निनावी तक्रार केली होती. पण आजुनपर्यंत रेती तस्करावर कसलीही कारवाई करण्याचे सौजन्य दाखविले गेले नाही. त्यामुळे पोलिस विभागाकडून तक्रारीस केराची टोपली देण्यात आल्याच्या चर्चा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या