Ticker

6/recent/ticker-posts

पांडे महालाचे मुख्य संरक्षक महेश पांडे यांचे दुःखद निधन,नागपूर निवास येथे घेतली अंतिम श्वास

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-पांडे महालाचे मुख्य संरक्षक व मालक श्री महेशकुमार रघुविर प्रसाद पांडे यांचे आज २७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वा.त्यांचे नागपूर येथील प्रशांतनगर यशोधाम निवास स्थानी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.काही दिवसापासून ते अस्वस्थ होते.
महेश पांडे भंडारा येथील आपल्या महालात ५० वर्षांपासून कुटुंबीयांसह राहत होते,१९९० च्या दशकात माझे त्यांचे वरच्या मजल्यावरील  निवासात जाणे_येणे होत असे.असे त्यांचे जवळीक असलेले मो सईद शेख यांनी सांगितले.पांडे महाल आणि गायमुख तीर्थ स्थळा बद्दल मला हवी असलेली माहिती त्यांनीच दिली होती,१९९६ साली गाय मुख देवस्थान ही त्यांची माल गुजारी प्रॉपर्टी होती,ला क" वर्ग तीर्थ स्थळाचा दर्जा शासन कडून देण्यात आला.भंडारा पांडे महालात ते राहत असताना महालात रौनक व महाल पाहणाऱ्यांची गर्दी असायची. अनेक लोकांशी त्यांचे स्नेही संबंध होते.ते भंडारा कोर्टात वकील होते.कव्वाली चे ते शौकीन होते.अनेकदा त्यांनी महालात कव्वाली शौकिना करिता प्रख्यात कव्वाल अब्दुल रब चांऊस चे कव्वाली चे कार्यक्रम आयोजित केले होते.१९९९ साली एका दुर्घटनेत त्यांचे लहान मुलांचं मृत्यू ने ते हादरून गेले आणि आपल्या वकिली च्या नोकरीला सोडून ते २००५ साली नागपूर ला जावून वसले.तेव्हा पासून हा अमूल्य ठेवा विरान पडलेला आहे.असे शेख यांनी माहिती दिली.उद्या २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० वा.त्यांचे निवास इथून त्यांची अंत्ययात्रा निघेल व अंबाझरी घाट येथे अंतिम संस्कार करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या