चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातून सर्व सामान्य जनतेचा लोकप्रिय उमेदवार म्हणून नरेंद्र पहाडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले असून गावागावात प्रचार करून सुजाण मतदार बांधव तसेच विविध समाजाच्या सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी ,
कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधून मतदान रुपी आशीर्वाद मागत आहेत.
सर्व सामान्य जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे म्हणाले की,खरे तर भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील मतदार बांधवांनी ज्यांना निवडून दिले त्यांनी दहा वर्षात पवनी ,भंडारा तालुक्यात एकही नवीन उद्योग स्थापन केला नाही, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा नंतर ही पवनी तालुक्यातील एमआयडीसी उद्योगाविना रखडलेली असून उद्योग सुरू होण्याची वाट बघत आहे.
उद्योगा विना सुशिक्षित बेरोजगार रोजगारासाठी वणवण भटकत आहेत परंतु त्यांच्या हाताला रोजगार मिळत नाही आणि वीतभर पोटाची खळगी भरता येत नाही अशी बेरोजगार बांधवांची ओरड आहे.शेतकऱ्यांच्या शेतमालाला खर्चावर हमी भाव मिळत नसल्याने शेती तोट्यात जात आहे.शेतमाल व खनिज आणि वन संपत्तीवर आधारित उद्योग स्थान केले नाही त्यामुळे धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गोसे प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांच्या समस्या सुटता सुटत नसून प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधी आणि महायुतीच्या सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यावर सोडले आहे.
महायुतीच्या सत्ताधाऱ्यांनी भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातच नाही तर भारत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची परिस्थिती हालाखीची करून ठेवली असून महाराष्ट्रात निर्माण होणारे उद्योग गुजरातला पाठविणाऱ्या ,महाराष्ट्र राज्याची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणाऱ्या खोकेबाज, स्वार्थी,मतलबी ,गद्दार लोकप्रतिनिधी सह संपूर्ण महायुती सरकारलाच सत्तेतून समूळ खाली खेचून कायमसाठी घरी पाठवा असे आवाहन सर्व सामान्य जनतेच्या मनातील उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी प्रचार सभे प्रसंगी केले.
पवनी तालुक्यातील एम आय डी सी उद्योगा अभावी ओस पडू लागली आहे.तर भंडारा तालुक्यातील एम आय डी सी विस्तार होण्याची वाट बघत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे हेतू
परस्पर दुर्लक्ष झाले आहे.नवे उद्योग नाहीत तर मतदार संघाचा विकास कसा होणार आणि उच्च शिक्षित सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार कसा मिळणार हा खरा प्रश्न आहे.शेतकरी ,शेतमजूर, कामगार , भूमीहीन, गोरगरीब,शोषित पिडीत नागरिकांची मुले,मुली रोजगारासाठी वणवण भटकत आहेत तर दुसरीकडे गुजरात मधील नेत्यांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठविणे सुरू आहे हे तर्क व न्याय संगत नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना मृगजळा सारख्या विविध योजनांचा लॉलीपॉप दिल्या जात असून दैनंदिन जीवनोपयोगी घर संसाराच्या वस्तू महाग करून वसुली केली जात आहे. रासायनिक खते, बियाणे आणि कीटक नाशके,शेतोपायोगी वस्तूंच्या किमती वाढत असून धानाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नसल्याने धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाच्या चक्रव्यूहात सापडले आहेत.एकंदरीत शेतकरी, शेतमजूर, कामगार, भूमीहीन, गोरगरीब,शोषित पिडीत जनतेला महागाईचे
चटके सहन करावे लागत आहेत. ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून याबाबत स्वतः लोकप्रतिनिधी आणि महायुतीचे सत्ताधारी गप्प बसले असून सर्व सामान्य जनतेचे आर्थिक शोषण करत आहेत ही बाब मतदार नागरिकांनी समजून घेणे काळाची गरज आहे .त्यामुळे भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील सुजाण शेतकरी, शेतमजूर, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब शोषित पिडीत मतदार बांधवांनो विकासाच्या नावावर जनतेला फक्त भूलथापा देऊन सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करणाऱ्या स्वार्थी ,संधीसाधू, खोकेबाज लोकप्रतिनिधी सह महायुतीच्या संपूर्ण सत्ताधाऱ्यांना सत्तेतून हद्दपार करा असे आवाहन सर्व सामान्य जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी केले.
नरेंद्र पहाडे हे पदाधिकारी ,कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन प्रचार करत असून प्रचारादरम्यान त्यांना
गावागावातून शेतकरी , शेतमजूर, कामगार, भूमीहीन , गोरगरीब,शोषित पिडीत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.ही सर्व सामान्य जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांची जमेची बाजु आहे.
0 टिप्पण्या