Ticker

6/recent/ticker-posts

गो-शाळा पदाधिकाऱ्यांनी केली शासनाची फसवणूक...!

• ३ कोटी ८० लाखाची परस्पर विकली जनावरे

• ३३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
 भंडारा :- कत्तलखान्यात जाणारी जनावरे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पकडून पालन पोषणासाठी गोशाळेत जमा केलेली जनावरे गोशाळा पदाधिकाऱ्यांनी बनावट हमीपत्राचे आधारे परस्पर विक्री करून शासनाची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्यात २००९ पासून २०२३ पर्यंत ३ कोटी ८० लाख ५५ हजार रुपयाची अफरातफर केली असून ५ गोशाळांचे ३३ पदाधिकाऱ्याविरोधात लाखनी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांचे मार्गदर्शनात तपास सुरू असून वृत्त लिहीपर्यंत आरोपी गोशाळा पदाधिकाऱ्यांना अटक केली गेली नव्हती. 
                     शेतकऱ्यांनाकडून अत्यल्प किमतीत पाळीव जनावरे खरेदी करून गोतस्करांकडून दाटीवाटीने वाहनात कोंबून कत्तलखाण्यात नेण्याच्या उद्देशाने वाहतूक करतांना सामाजिक संस्थांच्या मदतीने पोलिसांकडून पकडून प्राण्यांना क्रूरतेने वागविने, प्राणी संरक्षण कायदा तसेच मोटारवाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून गोतस्कराचे तावडीतून जनावरांची मुक्तता करून त्यांच्या चारापाण्याची सोय व्हावी. तसेच जनावरांना सुरक्षितता प्रदान व्हावी. ह्या उदात्त हेतूने पोलीसांकडून अन्नपूर्णा गोरक्षण संस्था, भवानी गोशाळा, निर्माण गोशाळा, सुखरूप गोशाळा पिंपळगाव/सडक आणि मातोश्री गोशाळा रेंगेपार/कोहळी येथे हजारो गोवंश पाठविण्यात आले होते. पण या गोशाळांत जनावरांना सुरक्षित वातावरणात न ठेवता निर्दयतेची वागणूक दिली जाते. या बाबद राज्य मानवी हक्क अधिनियमानुसार भवरलाल जैन यांनी ३ एप्रिल २०२४ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक भंडारा यांचेकडे तक्रार दाखल केली होती. 
                      तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी या तक्रारीची दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखा भंडारा तसेच लाखनी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे यांचे मार्फत चौकशी करण्यात आली. त्यात २ फेब्रुवारी २००९ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत भंडारा, गोंदिया, नागपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांनी पिंपळगाव/सडक व रेंगेपार/कोहळी येथील गोशाळेत जमा केलेली जनावरे माननीय न्यायालयाचे आदेश प्राप्त न करता परस्पर बनावट हमीपत्र तयार करून शासकीय मालमत्तेची अफरातफर व विक्री करून शासनाची ३ कोटी ८० लाख ५५ हजार रुपयाची फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे यांचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी मंगेश राघोर्ते(४०), विनोद बेहरे(४२), धनंजय दिघोरे(४३), मनोज राघोर्ते(४०), अजय मेश्राम(४५), सविता भुते(४०), झासी राघोर्ते(४२), रामेश्वर कमाने(४३), माणिक जीवतोडे(४०), नाना जीवतोडे(४२), भागवत शिवणकर(४१), भूपेश ब्राह्मणकर(४२), धनराज दिघोरे(४२), दिनेश भाजीपाले(४०), प्रभाकर जीवतोडे(४०), सुरेश कापगते(४२), शिवराम गिरेपुंजे(४२), पांडूरंग कापगते(४२), यशपाल कापगते(३८), शंभूभाई पटेल(४२), राकेश सार्वे(४२), ओमप्रकाश लांजेवार(४०), भास्कर भोतमांगे(४०), सचिन नागलवाडे(४५), ओमप्रकाश भोतमांगे(४१), श्यामराव चारमोडे(४२), नरेश पिंपळशेंडे(४३), मंगेश तरोने(४०), कैलास काळसर्पे(४२), राकेश कठाने(४२), विनोद भोंडे(४३), वामन कमाने(४०), रवींद्र काळसर्पे(४२) यांचेवर अपराध क्रमांक ४९८/२०२४ कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१ ३४, भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव तपास करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत आरोपींना अटक केली गेली नव्हती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या