Ticker

6/recent/ticker-posts

जुन्या पेन्शनसाठी शिक्षक धडकले विधान भवनावर

• जुनी पेन्शन कृती समिती भंडारा द्वारा धरणे आंदोलन

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व २००५ नंतर १००% अनुदानावर आलेल्या खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. या करिता जुनी पेन्शन कृती समिती भंडाराचे वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडक देऊन जिल्हाध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन करून सरकारचे ध्यानाकर्षण केले आहे.
              केंद्र सरकारने १ नोव्हेंबर २००५ पुर्वी जाहिरात आलेल्या व २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली. केंद्र सरकारच्या धर्तीवर गुजरात सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली. महाराष्ट्र सरकारनेही ग्रामविकास खात्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू केली मात्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील शिक्षक-कर्मचारी यांना मात्र जुन्या पेन्शन पासून वगळले. राज्यातील २६००० शिक्षक- कर्मचारी यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीश व राज्यसरकार यांना व्हावी यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशन काळात १६ ते १९ डिसेंबर पर्येंत १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी जुनी पेन्शन कृती समितीच्या वतीने प्राचार्य ज्ञानेश्वर गलांडे, प्रतिभा टापरे,नरेंद्र पिंपळे,रवींद्र वाठ,अंजुषा बोधनकर, रवींद्र हिवरकर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यात आले.
 भंडारा जिल्हा जुनी पेन्शन कृती समितीच्या वतीने नागपूर येथील यशवंत स्टेडीयम येथे १९ डिसेंबरला एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाला १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी जुनी पेन्शन कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे, नीलकंठ कापगते, धनंजय तुमसरे, देवराम फटे रामभाऊ राघोर्ते, चेतन उके, वामन बोपचे, अनिल गभने, झामराव लामकाने, राजेश भुते, विनोद बडोले, महेश भोयर, दिलीप चौधरी, मुकेश साखरे, राकेश चकोले, चित्रा सिंगनजुडे, एस. जी. धांडे, के. एस हुमणे, जिवतु गायधने, एस जी बुद्धे, डी. के. मोहतुरे, ताराचंद धकाते, हेमराज कापगते,नरेंद्र कापगते, ताराचंद धकाते, जी टी खंडाईत, पी. पी ठाकरे, हेमराज गोबाडे, टेकचंद सोनकुसरे, संगीता वाघाये, नाना राघोर्ते, हेमराज सय्याम, खेमराज परशुरामकर, परमानंद चोले, जानेश्वर येळेकर युवराज राणे, श्रीधर वाघाये, प्रशांत मेश्राम, विजय वाघाये, राजेश काडगाये, चांगदेव येरणे, दिनेश वनवे, गणराज बिसेन व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या