Ticker

6/recent/ticker-posts

रोजगार सहाय्यक मानधनाचे प्रतीक्षेत..!

सप्टेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ चे मानधन थकले

कुटूंबावर उपासमारीची पाळी, प्रशासनाचे दुर्लक्ष

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत ग्राम स्तरावर अत्यल्प मानधनात काम करणारा रोजगार सहाय्यकाचे सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीचे ३ महिन्याचे मानधन थकले असल्याने कुटुंबावर उपासमारीची पाळी आली असली तरी नरेगा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. रोजगार सहाय्यकांच्या कुटुंबाचा विचार करून थकीत मानधन लवकरात लवकर अदा करण्यात यावे अशी मागणी होत आहे. 
                   केंद्र सरकारने सन २००५ साली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  या नावाची योजना आणून तिचे कायद्यात रूपांतर करून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अस्तित्वात आणून ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना १०० दिवसाची प्रत्येक जाबकार्डला कामाची हमी दिली तिचा विस्तार संपुर्ण भारतभर सन २००८ ला करण्यात आला असून मजुरांवर देखरेख ठेवण्याकरिता तसेच अहवाल सांभाळण्याकरिता व दस्तावेज अद्यावत ठेवण्याची जबाबदरीकरीता  गाव स्तरावर ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली असली तरी दीर्घकाळा पासून अत्यल्प व तुटपुंज्या मानधन मिळणारा ग्राम रोजगार सेवक मानधन विना वंचित आहे आज राज्यात शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या नियोजीत तारखेला होत असून ग्राम रोजगार सहाय्यकाला तुटपुंजे मानधन मिळत असलेतरी सुद्धा त्यांचे मानधन तीन महिन्याचा दीर्घ कालावधी होऊन भेटत नसल्याने ग्रामरोजगार साहाय्यकांनी नाराजी व्यक्त केली आहे.        
             ग्रामरोजगार सेवकाचे मानधन झालेल्या कामाच्या ६ टक्के निधीतून मिळत असल्याने सदर योजना केंद्र सरकारची असल्याने इतर राज्याच्या तुलनेत मासिक मानधनात तापवत असून  इतर राज्यात नियोजित वेळेवर मानधन मिळत आहे मग महाराष्ट्रात उशीर का? असा प्रश्न अद्यापही सुटलेला दिसत नाही. निदान २०१६ पासून प्रवास व अल्पोहार भत्ता, स्टेशनरी खर्च,प्रोत्साहन मानधन तसेच वाढीव मानधन व सप्टेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२४ पर्यत रोजगार सहाय्यकाचे थकीत मानधन मिळाले नसल्याने दिवाळी सारख्या या सणासुदीच्या काळात महागाईने होरपळून गेलेल्या ग्राम रोजगार सहाय्यकाचे प्रलंबित मानधन तीन महिन्यांपासून मानधन जमा व्हावे, ही अपेक्षा होती. पण मानधन जमा नाही झाल्यामुळे रोजगार सेवकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.लाखनी तालुक्यात ७० रोजगार सेवक असून  भंडारा जिल्ह्यात एकूण ५२८ ग्राम रोजगार सहाय्यक काम करत आहे.
              मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील अकुशल मजुरांना रोजगार देण्याचा काम ग्राम रोजगार सेवक करीत आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे पुर्ण करून घेण्यात ग्राम रोजगार सेवकांची महत्वाची भुमिका असते. ग्राम रोजगार सेवकांना कामाचे स्वरूप पाहून मानधन ठरविण्यात येत असल्याने गाव  पातळीवर घरकूल बांधकाम, वृक्ष लागवड, फळबाग लागवड, विहिरी, शोषखड्डे, भातखाचरे, मजगी, सार्वजनिक स्वरूपाचे कामे,वयक्तिक स्वरूपाचे कामे यासह विविध कामे करून घेण्यासाठी ग्राम रोजगार सेवक मोलाचे योगदान देतात. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांना गत सप्टेंबर महिन्यापासून तसेच २०१६ पासून देय असलेले  प्रवास व अल्पोपहार मिळाले नसल्याचे रोजगार सहाय्यकाचे म्हणने आहे. निदान येणारी मकर संक्रात या सनासुदी पूर्वी मानधन होईल, अशी अपेक्षा असून त्यांच्या आशेवर पाणी फेरल्या तर जाणार नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोजगार सहाय्यकाचे येणारे सण, उत्सव अंधारातच राहणार तर नाही ना असे दबक्या आवाजात रोजगार सहाय्यकामध्ये बोलल्या जात आहे. या आधी तालुका स्तरावरून तसेच जिल्हा स्तरावरून प्रलंबित मानधनाचे देयक सादर करून लवकरात लवकर प्रशासनाकडून ग्राम रोजगार सहाय्यकाच्या बँक खात्यावर मानधन वितरीत करावे अशी मागणी लाखनी तालुक्यासह तसेच भंडारा जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यकानी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या