Ticker

6/recent/ticker-posts

वाळू माफिया वर कारवाई नगण्य स्वरूपात,तलाठी, मंडळ अधिकारी, व तहसीलदार,, करतं आहेत नजर अंदाज,,

 चित्रा न्यूज, ब्युरो

नांदेड -जिल्हाधिकारी.व.पोलिस आधिक्षक यांनी जोरदार वाळू माफिया वर कारवाई करण्यात यावी अशी तयारी सुरू केली आहे, नांदेड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांचा दबदबा निर्माण झालेला असताना तरीही खालच्या अधिकाऱ्यांवर त्या मध्ये काहिच परिणाम दिसून येत नाही तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, कारवाई करण तर दुरच वाळू माफिया सोबत मिटींगी करत असतात ग्रामीण पोलीस स्टेशन चे पि,आय,पि,एस आय, यांचें हि वाळू माफियाशी लागेबांधे आहेत वाळू ने भरलेले ट्रक,हायवा, गाड्या दिवसा ढवळ्या रस्त्यावर धावताना दिसत आहेत, सर्रास चढ्या भावाने वाळूची विक्री होत आहे, रात्री वाळू उपसा केला जातो, सकाळी चार पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत वाळू विक्री जोमात सुरू असते, जसं काही कुणाची भिती नसल्यगत बिनधास्त हे अधिकारी लोक वरिष्ठांना न जुमानता त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत, पोलीस निरीक्षक असो किंवा तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार असो एका माळेचे मणी, थंडी च्या दिवसात लोक कुडकूडत आहेत,हे अधिकारी, कर्मचारी,आपला खिसा गरम करून पैशाची ऊब घेऊन रंगीत पार्टी करत आहेत, त्यामुळे वाळू माफिया वर कोणत्याही प्रकारचा दबाव राहीला नाही,हम करे सो कायदा आसं त्यांचं चाललंय,तरि वरिष्ठ अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, अभिजीत राऊत साहेबांनी विशेष लक्ष देऊन वाळू माफिया वर प्रतिबंध घालन गरजेच आहे, गरिबांना घरकुल बांधकाम करण्यासाठी वाळू भेटना झाली आहे, पाच ब्रास वाळू गरिब दिव्यांगांना घरकुल बांधण्यासाठी देण्याचा निर्णय झालेला असून आणखी एका ही दिव्यांगांना वाळू मिळाली नाही ही खेदाची बाब आहे, प्रत्येक वाळू माफिया वर व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी कारवाई करावी,दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता,मो,9529944770,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या