उधन्याच्या मुकेश नायका चा रेल्वेतील भीतीदायक प्रवास
पंकज पाटील नाशिक विभागिय संपादक
अमळनेर : त्याचा जीव गुदमरला होता...जिवाच्या आकांताने तो ओरडत होता...भीतीने व्याकुळही झाला होता....धावत्या रेल्वेच्या डब्याचा पत्रा ठोकत होता....अमळनेर ला रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याची सुटका केली अन कायद्याचे पालन करत उधना पोलिसांच्या ताब्यातही दिले. उधन्याच्या मुकेश नायकाचा भीतीदायक प्रवास
२० रोजी उधना येथील बसस्थानकजवळ मोरारजी वसाहतीजवळ राहणारा मुकेश धीरूभाई नायका वय ४४ हा कुणीतरी पाठलाग करतेय म्हणून धावत पळत उधना येथे मालगाडीच्या डब्यात बसला. त्या डब्यात अभिषेक शुक्ला या व्यापाऱ्याचा माल नियोल हुन नारायणपूर मुझफ्फर नगर ला पाठवण्यासाठी भरला जात होता. मुकेश लपून बसल्याने तो कोणाला दिसला नाही. माल भरल्यानन्तर डबा सील करण्यात येऊन त्याला लॉक करण्यात आला. रेल्वे निघाली अन मुकेशचा जीव गुदमरायला लागला. मुकेश जीवाच्या आकांताने ओरडत होता डब्याचा पत्रा ठोकत होता. मात्र मुकेश चा डबा गार्ड व्हॅन पासून तिसरा होता. त्यामुळे धावत्या रेल्वेत गार्ड किंवा कोणालाच आवाज ऐकू येत नव्हता. गाडी अमळनेर तालुक्यात भोरटेक ला येऊन थांबली. अन मुकेशने पुन्हा आवाज दिला डबा ठोकायला लागला. भोरटेक येथे काम करणाऱ्या रेल्वे मजुरांना समजले की कोणीतरी आत आहे. त्यानी गार्ड ला सांगितले. तेथील उपस्टेशन अधीक्षक यांनी अमळनेरला स्टेशन अधीक्षक याना कळवून अमळनेर ला गाड थांबण्याचे नियोजित नसताना ५ वाजून ४० मिनिटांनी गाडी थांबवली. डब्यात माल भरलेला असल्याने विना परवानगी ते तोडणे चुकीचे असल्याने शुक्ला यांच्याशी संवाद साधून परवानगी घेतली आणि रफिक यांनी हातोड्याने सील व लॉक तोडले आणि मुकेशची सुटका केली. मुकेशला रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात बसवण्यात येऊन त्याची विचारपुस करण्यात आली. मात्र घडलेला प्रकार बेकायदेशीर असल्याने मुकेश ला उधना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कामी रवी पांडे , लोकोपायलट पंकजकुमारसिंग ,रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
तब्बल १ तास १८ मिनिटांनी ६ वाजून ५८ मिनिटांनी डबा पुन्हा सील करून मालगाडी रवाना करण्यात आली.
0 टिप्पण्या