• विद्याभारती वाचनालयाचे अध्यक्ष जीवनदास नागलवाडे यांचे प्रतिपादन
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- सुशिक्षित बेरोजगार युवकांना बेरोजगारीवर मात करायची असेल तर स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन गुणवत्ता प्राप्त करावी. गुणवत्ता टिकवून ठेवाल तरच यशस्वी व्हाल. ग्रामीण परिसरातील विद्यार्थी शहरातील मोठमोठ्या अभ्यासिका केंद्रामध्ये गेल्याने पालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. पालकांची आर्थिक अडचण होऊ नये. याकरिता शिवणी/धाबेटेकडी, तालुका लाखनी येथे अभ्यासिका केंद्रास मंगळवार(ता.३१ डिसेंबर) रोजी सुरुवात करण्यात आली. उद्घाटन समारंभ प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जीवनदास नागलवाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आपले विचार व्यक्त केले.
विद्याभारती सार्वजनिक वाचनालय शिवणी/धाबेटेकडी येथे मंगळवारी(ता.३१ डिसेंबर) रोजी सायंकाळी ५:०० वाजता अभ्यासिका केंद्र उद्घाटन व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जीवनदास नागलवाडे, मुख्य अतिथी राम आश्रय सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील गिरेपुंजे, विद्याभारती सार्वजनिक वाचनालयाचे सचिव पतीराम पंचबुद्धे, सहसचिव मुर्लीधर शेंडे, सदस्य शिवकुमार खांडेकर, भीमराव धार्मिक, सदस्या स्वानुताई गायधने, शेवंता पंचबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या प्रसंगी विद्याभारती वाचनालयाचे माजी अध्यक्ष अजबराव नागलवाडे, शुक्राचार्य विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक देवाजी गिदमारे यांचा वाचनालयाचे अध्यक्ष जीवनदास नागलवाडे यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अभ्यासिका केंद्र उदघाटन व सत्कार समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी विद्याभारती सार्वजनिक वाचनालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची प्रसंशा केली. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश शेंडे, टोलीराम शेंडे, विश्वनाथ खंडाते, भास्कर मेश्राम, आकाश शेंडे, हेमराज शेंडे, लीलाधर हारगुडे, दिगंबर परसूरामकर, सुखदेव नाकाडे, मोतीराम नेवारे यांचेसह शिवणी परिसरातील गावकरी व विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रंथपाल युवराज पंचबुद्धे यांनी तर उपस्थितांचे आभार मुनेश्वर नागलवाडे यांनी मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


0 टिप्पण्या