Ticker

6/recent/ticker-posts

बीड जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यात फरार आरोपींवर पोलिसांची शोध मोहीम

चित्रा न्युज ब्युरो
बीड : केज पोलिस ठाणे अंतर्गत गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या चार आरोपींविरोधात पोलीस विभागाने शोध मोहीम सुरू केली आहे. या आरोपींनी खुनासारखा गंभीर गुन्हा केल्यानंतर पसार झाले असून, त्यांना पकडण्यासाठी पोलीस दलाने नागरिकांचे सहकार्य मागितले आहे.

फरार आरोपींची माहिती:

1. सुदर्शन चंद्रभान घुले
वय: 26 वर्षे
व्यवसाय: शेती व मुकादम
राहणार: टाकळी, ता. केज

2. कृष्णा शामराव आंधळे
वय: 30 वर्षे
व्यवसाय: शेती व मुकादम
राहणार: मैदवाडी, ता. धारूर

3. सुधीर ज्ञानोबा आंधळे
वय: 23 वर्षे
व्यवसाय: शेती
राहणार: टाकळी, ता. केज

4. सुधीर ज्ञानोबा सांगळे
वय: 23 वर्षे
व्यवसाय: शेती
राहणार: टाकळी, ता. केज

या आरोपींवर केज पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 637/2024 नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड विधानातील कलम 103(2), 140(1), 126, 118(1), 34(4), 324(4)(5), 189(2), 190 यांअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्याने आरोपींचे ठावठिकाण शोधून त्यांना अटक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वरील आरोपींची माहिती किंवा ठावठिकाण कोणालाही माहित असल्यास, त्यांनी त्वरित खालील संपर्क क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, तसेच त्यांना योग्य बक्षीसही दिले जाईल.

संपर्क क्रमांक:
पोलीस अधीक्षक, बीड: 9560409479
अपर पोलीस अधीक्षक, बीड: 8275046070
अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई: 9004428152
सहा. पोलीस अधीक्षक, केज: 9013661808
पोलीस नियंत्रण कक्ष: 02442-222333 / 222666, मो.: 7249089102 टोल-फ्री क्रमांक: डायल 112

पोलीस विभागाने केलेल्या या आवाहनामुळे आरोपींना पकडण्यात नागरिकांची मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या