Ticker

6/recent/ticker-posts

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील फरार दत्तात्रय गाडेवर पुणे पोलिसांचे १ लाखाचे बक्षीस

चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे: स्वारगेट येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणातील फरार संशयित दत्तात्रय गाडे याच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गाडे हा गुन्हा घडल्यापासून फरार असून, पोलिस त्याच्या शोधात आहेत. नागरिकांना कुठलीही महत्त्वाची माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील जनतेला आवाहन:
एका निरपराध भगिनीवर अन्याय करणारा हा गुन्हेगार अजूनही मोकाट फिरतोय! हा फोटो एवढा शेअर करा की, कोणत्याही कोपऱ्यात लपला तरी तो सापडला पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या मदतीने आपण तिला न्याय मिळवून देऊ शकतो. चला, अन्यायाविरुद्ध आवाज उठवू आणि या समाजविघातक प्रवृत्तीला धडा शिकवू!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या