Ticker

6/recent/ticker-posts

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांचा दुबईत सपत्नीक भव्य सत्कार


चित्रा न्युज ब्युरो
दुबई- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा आणि त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले यांचा दुबई येथे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे भव्य सत्कार करण्यात आला. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड च्या या आंतर राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात जगभरातील विविध देशांचे मान्यवर उपस्थित होते अशी माहिती वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमुख संयोजक एड.संतोष शुक्ला यांनी दिली.

दुबई येथे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड च्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ना.रामदास आठवले यांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नात सोम्या शंकर बोस यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड चा पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड चे आखाती देशांचे प्रमुख जितेंद्र  मटवणी एड.संतोष शुक्ला आणि इजिप्त, डेन्मार्क, रुमानिया, लंडन, अमेरिका, अबुधाबी आदी १२ देशांच्या मान्यवरांचा या कार्यक्रमात वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड चा पुरस्कार ना.रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करून सत्कार करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या