Ticker

6/recent/ticker-posts

मौजा-चिचबोडी येथे भव्य दिवस-रात्र कबड्डी स्पर्धेचा समारोप; माजी खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते गौरवपूर्ण मार्गदर्शन


चित्रा न्युज प्रतिनिधी
 सावली:- ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि युवकांमध्ये स्पर्धात्मक खेळाची चेतना निर्माण करणाऱ्या भव्य दिवस-रात्र कबड्डी स्पर्धेचा समारोप मौजा-चिचबोडी, ता. सावली, जि. चंद्रपूर येथे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी मा.खा. अशोकजी नेते यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करत कबड्डीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.

"कबड्डी ग्रामीण भागातील आत्मसन्मानाचे प्रतीक" – अशोकजी नेते

ते आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले,
"कबड्डी हा केवळ एक खेळ नसून ग्रामीण भागातील युवकांच्या आत्मसन्मानाचे आणि संघभावनेचे प्रतीक आहे. हा खेळ युवकांना एकजूट, शारीरिक सुदृढता आणि सहकार्याचा संदेश देतो. अशा भव्य स्पर्धांमुळे युवकांमध्ये क्रीडाप्रेम जागृत होते आणि त्यांच्या भविष्याला एक नवी दिशा मिळते. त्यामुळे युवकांनी शिक्षणासोबतच खेळालाही तितकेच महत्त्व द्यावे."
यावेळी पुढे बोलत नेते यांनी गावातील समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन मांडत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यावर त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाशजी पाल यांनीही युवकांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांनी मेहनत, संयम आणि सातत्य ठेवून यशाच्या दिशेने वाटचाल करावी, असा संदेश दिला.

या भव्य समारंभास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाशजी पाल, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सामाजिक नेते देविदासजी बानबले, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. योगिता डबले, भाजपा ज्येष्ठ नेते दौलतजी भोपये, युवा नेते पुनमजी झाडे, सामाजिक कार्यकर्ते नितिनजी पाल, ग्रा. प. सदस्य किशोरजी खेडेकर, शरदजी कावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

गावातील नागरिक, कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य स्पर्धेचा आनंद घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या