Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा येथील काही जुन्या काळातील वारसा स्थळांचे संरक्षण बाबत ग्रीन हेरिटेज ने आमदार भोंडेकर यांना दिले पत्र


चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-भंडारा शहर परिसरात इंगजांचे काळातील काही प्राचीन,जुन्या. वास्तू, वारसा स्थळे असून ते दुर्लक्षित,उपेक्षित आहेत.त्यांचा एक गौरवशाली इतिहास आहे,नुकतेच ग्रीन हेरिटेज कडून या स्थळांची पाहणी करण्यात आली होती,त्यांचे जतन,संरक्षण द्वारे त्यांना ऊर्जितावस्था प्राप्त होवून आणि भांडारेकराना यांचे दर्शन व्हावे म्हणून नुकतेच ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्थे तर्फे आयोजित आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांना संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष  मो सईद शेख यांचे हस्ते पत्र देण्यात आले,सोबत अतुल वर्मा हे उपस्थित होते.
इंग्रजांनी वैनगंगा परगणे जिंकल्यानंतर रिचर्ड जैकिंस ने या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी सर पी.विलकिंसेंस ची सन १८१८ च्या काळात नियुक्ती केली होती.१८२२ मध्ये त्यांचे हे मुख्य स्थान होते.भंडारा बस स्थानक जवळ १८५३ साली जुनी बारादरी,प्रवेशद्वार,(आज चा कोंडवाडा)यांच्या काळात निर्माण करण्यात आली,नंतर १८७० साली मोठाबाजार स्थित कृषी उत्पन्न बाजार समिती ची वास्तू बनविण्यात आली.
खांब तलाव येथील नगर परिषद ची १९०० मध्ये निर्मित गोलाकार टिनाची, विटा,लोखंड,मजबूत शेड आज १२५ वर्षा नंतर ही टिकून आहे. शिवाजी ,शुक्रवारी वार्ड येथील १३ वी शताब्दितील यादवकालीन,मंदिर परिसर स्मारक,छत्री,बोडी असून या क्षेत्राचे जीर्णोद्धार,संरक्षण गरजेचे आहे. पिंगलाई स्थीत भव्य प्राचीन वास्तू.देशबंधू वार्ड येथील खांब तलाव परिसर येथे रामद्वारा, साधुमठ(समाधी) स्थळ चे १९२२मध्ये ५ हजार स्केयर फूट मध्ये निर्माण करण्यात आले होते,प्रथम इथे केदारनाथ महाराज राहत होते नंतर मठात रामदेव महाराज राम_रांम चे धून मध्ये सदैव लिन राहायचे,येथील तळघरात सिद्ध्योगी साधना करीत असत,भिंती मध्ये काही देवी देवतांचे दुर्लभ मुर्त्या कोरलेल्या आहेत . कीवदंती नुसार इथून एक रस्ता पांडे महाल येथे निघतो,असे सांगतात.
बजरंग चौक येथे दाढी परिवार चे निवास स्थानी ४०० वर्षापूर्वी रामदास महाराज भाणारा या ठिकाणी आले होते,त्याच जागी रामदासी मठ स्थापित करण्यात आले.रामनवमीला येथे मोठा उत्सव होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या