Ticker

6/recent/ticker-posts

खून करणाऱ्या आरोपीला मौदा परिसरातून अटक

चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर:- पोलीस स्टेशन इमामवाडा अंतर्गत येणाऱ्या जातटरोडी पोलीस चौकी समोर दिवसाढवळ्या निर्घुन खून करण्यात आला होता. मृतकाचे नाव नरेश वालदे असे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने मौदा परिसरातून मुख्य आरोपी निलेश मेश्राम व त्याचे साथीदार ईश्वर सोमकुवर व अक्षय सावळे यांना अटक केली आहे. आरोपी निलेश मेश्राम यांनी आपल्या साथीदारा सोबत मिळून एकतर्फी प्रेमातून हा खून केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी आरोपीला इमामवाडा पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या