Ticker

6/recent/ticker-posts

धुळ्यातील घरफोड्यांचा छडा, अट्टल चोर जेरबंद

चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे :-धुळे जिल्ह्यातील सोनगीर हद्दीत बुरझड आणि कापडणे येथे 18 व 19 मार्च रोजी झालेल्या दोन घरफोड्यांचा छड़ा स्थानिक गुन्हे शाखेने लावला. बुरझड येथील मीराबाई पाटील आणि कापडणे येथील रविंद्र पाटील यांच्या घरातून सोने व रोख रक्कम चोरली गेली होती. पथकाने जळगावचा सराईत चोर प्रविण सुभाष पाटील (वय 32) याला ताब्यात घेतले. त्याने कबुली दिली असून, 3. 18 लाखांचा मुद्देमाल, सोने, रोख आणि मोटारसायकल जप्त झाली. त्याच्यावर 20-25 गुन्हे दाखल असून, तो दिवसाढवळ्या घरफोडी करत असल्याचे उघड झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या