चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-रेडिमेड,इंन्सटंन्ट व आॅनलाईनच्या जमान्यातही ग्रामीण भागातील कांही महिलांभगीनी घरगुती पापडं,कुरोडी, खारोड्या,शेवया व बटाटा चीप्स हे घरगुती पदार्थ तयार करण्यात मग्न असल्याचे चीञ हाळी-हंडरगुळी व परिसरातील गावात दिसुन येत आहे. पुरणपोळी,तीळाचीपोळी,पिज्झा, बर्गर,भाकर,चपाती हे व अन्य पदार्थ आता शहरांसह गावखेड्यांमध्ये ही आॅनलाईनद्वारे मिळत असल्याने घरगुती अन्न पदार्थ बनविण्याकडे कांही उच्चभ्रू महिलां- भगीनींनी दुर्लक्ष केले असले तरी पण या भागातील हजारो कुटूंबातील स्ञी "जुनं तेच सोनं" असे म्हणत घरगुती कुरड्या,खारोड्या,पापडं,शेवया या सारखे पदार्थ तयार करीत असल्याने पुर्वजांची ही परंपरा गावखेड्यातील खेडूत माय-माऊलींनी जपली आहे. आजच्या विज्ञान,तंञज्ञानाच्या युगात हव ते घरबसल्या मोबाईलद्वारे मिळू लागल्याने हात-पाय मळणे नको,ना वेळ वाया घालवणे नको.असे म्हणत खेड्यातही अनेकजण आॅनलाईन खरेदी करण्यावर भर दिला आहे.तर कांही जुन्या-जाणत्या वयस्क महिला ह्या रेडिमेडच्या जमान्यातही घरच्या स्वादापुढे आॅनलाईन मागवलेल्या मालांचा स्वाद कायबी नाही.असे म्हणत बटाटा चीप्स,शाबुचे पापडं, शेवया,खारोड्या यासारखे पदार्थ बनवण्यात मग्न दिसतात.सकाळी दहाच्या आत म्हणजे ऊन्हांचा पारा वाढण्यापुर्वीच वरील पदार्थ बनवुन महिला घरकामांत मग्न होतात.
हे विशेष..!
कुरड्या,खारोड्या,पापडं,चीप्स हे पदार्थ तयार करण्याचा मोसम म्हंजे ऊन्हाळा.आणि सध्या कडकडीत उष्णता जाणवु लागल्याने अनेक महिला गच्चीवर,अंगणात पांढ-या सुती कापडावर हे पदार्थ बनविताना आणि उष्णता कमी होताच त्या सुती पांढ-या कापडावर पाणी सिंपडून सर्व पदार्थ मोकळे करुन व्यवस्थित पॅक करतात.*देवांना नैवद्य
कुरोड्या,खारोड्या,पापडं,चीप्स हे पदार्थ कापडावरुन काढल्यानंतर या पदार्थांचे सर्वप्रथम देवघरातील देवी- देवतांपुढे नैवद्य म्हणुन ठेवल्यानंतरच कुरोड्या,खारोड्या,पापडं व चीप्स या पदार्थांची *टेस्ट* (चव) घेतात..


0 टिप्पण्या