चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई : देशात शांती टिकवावी, हा देश सर्वधर्मीयांचा आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन आघाडी, वॉर्ड क्र. १३३ ( घाटकोपर) व मस्जिद मदरसा मोहबुबिया यार अलविया यांच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास भिमराव आंबेडकर उपस्थित होते. सदर कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सामाजिक एकता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिमराव आंबेडकर साहेबांनी आपल्या भाषणात देशात अमन शांतता,आणि एकात्मतेचा संदेश दिला. त्यांनी सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक ऐक्य आणि परस्पर प्रेम जोपासण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी मोबीन अन्सारी जी यांच्या वडिलांनी भिमराव आंबेडकर यांचे हार घालून स्वागत केले. उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन इफ्तार केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मस्जिद व वंचित बहुजन आघाडीचे मोबीन अन्सारी व रोहित जगताप आदींनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या