चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी | प्रतिवर्षाप्रमाणे यंदा पण श्री.महादेव बारस {कावडी विवाह} व याञा महोत्सवा निमित्य हंडरगुळी ता.उदगीर येथील महादेव मंदीरात 2 एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरु होत आहे.व याची सांगता दि.9 एप्रिल रोजी होणार आहे.तरी याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवहान श्री.महादेव मंदीर व श्री.जळोजी-मळोजी मंदीर समिती तर्फे पञकाद्वारे केले आहे. या सप्ताहातील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे असतील.
स.६ते७ यथाविधी शिवपुजन,स.७ते १०श्री.शिवसहस्ञनाम,श्री.शिव
लिलाम्रत ग्रंथ सामुदायीक पारायण, स.११ते दु.१ भोजन व विश्रांती,दु.२ ते४ गाथा भजन,सायं ४ते६ भावार्थ श्री रामायण,वाचक विश्वनाथ स्वामी सुचक निळकंठ दत्तनुरे,सायं.६ते७वा हरिपाठ,राञी ७ते८भोजन व राञी ९ ते११ हरिकिर्तन प्रमुख विनेकरी सुळे ज्ञानोबा,राञी १२ते पहाटे४हरिजागर व पहाटे ४ते६ काकडा आरती.
तसेच या सप्ताहात रोज राञी ९ ते ११पर्यंत खालील कर्तनकारांचा सहभाग राहणार आहे.यामध्ये सर्वश्री हभप.महेश महाराज वायगावकर,गोपाळ महाराज वाढवणकर,पप्पूदेव जोशी हडोळती, सुर्यभान महाराज घरणीकर,नामदेव सुळे महाराज हंडरगुळी,रामराजे भोसले महाराज शेळगावकर,राम महाराज बोरवंडकर या महाराजांचे किर्तन होणार आहेत.तसेच दि.६ रोजी स.१०ते१२ श्रीरामनवमी गुलालाचे किर्तन व दि.९ रोजी स.१० ते १२ काल्याचे किर्तन होणार आहे.
तेंव्हा वरील सर्व धार्मिक कार्यक्रमां- चा भाविक-भक्तांनी आस्वाद घ्यावा.


0 टिप्पण्या