Ticker

6/recent/ticker-posts

"लग्नाची वरात; डि.जे.शिवाय जाईना घरात" आवाजाची व लेझर लाईटची भीती हाळी-हंडरगुळीकरांत ...!!——————————————

 चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :- हलगी,ढोलकी व बॅंडबाजा यांची जागा "डीजे" ने घेतली आहे.आणि छोटे-मोठे असलेल्या गावात ( मयत वगळता )"कानं व -हदय" फाडणारा "डीजे" चा दणदणाट बहूतांश सण व उत्सवांमध्ये होताना सामान्य जनतेस दिसत आहे. विशेष म्हणजे आजकाल अनेक नवरदेवाच्या लग्नाची वरात डी.जे.विना घरी जात नसल्याचे चिञ दिसते.तसेच यावेळी डोळे दिपवनारे लेझर लाईट्स लावत असल्याने या सर्वांची भीती जनतेत पसरली आहे. माञ.संबंधित यंञणेने आजवर या धांगडधिंगाण्यावर कारवाई का केली नाही.याचेच जनतेला नवल वाटत आहे.
तसेच "मनी" मुळेच"D.J."चालकांवर कार्यवाही करण्याचे "धाडस" करेना कुणी.अशी कुजबूज D.J.च्या रोज होणा-या मानसिक व शाररीक ञासामुळे वैतागलेले सामान्य हाळीकर जनतेतून ऐकू येते.तसेच डीजे च्या नियमबाह्य , असाह्य दणदणाटाविरुध्द तिव्र नाराजी,विरोध मागे एका  शांतता समितीच्या बैठकी मध्ये हाळीतील एका जेष्ठ व्यक्तीने दर्शवला होता.तेंव्हा नियम मोडून दणदणाट करणा-या डीजे चालक मंडळीवर कडक कारवाही करु.असे त्या बैठकीत पोलीस अधिका-याने आश्वासन दिले होते. माञ,गणेश उत्सव ते आज पर्यंत झालेल्या अनेक उत्सवांमध्ये व लग्नाच्या वरातीमध्ये नियमबाह्यरितीने डीजे वाजत आहे . तरीही अद्याप कारवाही का केली नाही ? का,एखादी दुर्घटना घडल्यावरच डीजे चालकांवर कारवाही करणार आहात का ? असे प्रश्न "डीजे"मुळे वैतागलेले हाळी व हंडरगुळीचे नागरीक तसेच -हदयंरुग्ण असलेले व जेष्ठ मंडळी सं.प्रशासनाला विचारतात .
पुर्वी कोणताही सण,उत्सव असला तरीही हलगी,ढोलगी,बॅडबाजा यांचा वापर व्हायचा.व याचा आवाज कर्ण मधूर असायचा.परंतू,कालांतराने या वाजंञीची जागा "डीजे डाॅल्बी" या घातक वाद्याने व लेझर लाईटने घेतली आणि आज मयत वगळता कोणत्याही उत्सवांमध्ये तसेच ऐ-या-गै-यांच्या "बर्थ डे" मध्ये ही "डीजे" नसेल तर ते साजरा होत नाहीत.इतकी जबरदस्त "क्रेझ" फॅशन D.j.ची बनली आहे . "पब्लिक प्लेस" व "हाॅस्पिटल्स" या ठिकाणी "डीजे डाॅल्बी" वाजविणे कायद्याने गुन्हा आहे.तरीही मागील कित्येक महिण्यापासुन हंडरगुळीच्या गल्लीबोळात व मेन मार्केट मध्ये d.j. चा सर्रासपणे दणदणाट होताना दिसत आहे.आणि येथील "डीजे" मालकांना संबंधितांचा आर्शीवाद आहे.म्हणुनच नियमबाह्य आवाज वाढवून "डीजे" चा दणदणाट केला जातोय.तरीही मालकांवर कारवाही  करण्याचे धाडस आजवर कुणी पण दाखविले नाही.व पुढे दाखविणार ही नाहीत.ते ही "मनी" मुळे..म्हणे..!

लग्नाची वरात डीजे शिवाय

जाईना घरात..!!
सध्या लग्नांचा हंगाम सुरु झाला असुन, एखाद्या मुलाचे लग्न हे  बाहेर गावी असो किंवा स्वघरी.त्या वराची वरात "डीजे" नसेल तर घरातच जाईना ! अनेकांच्या वरातीत राञी 12 तसेच 12-30 वा.पर्यंत डीजेचा व फटाके यांचा दणदणाट होताना दिसुन येतो. 

भजन-किर्तनाला १० ची वे 

आणि D.J.ला मध्यराञीची का
ध्वनीवर्धक म्हणजे स्पीकर हे राञी 10 पर्यंत ते ही लिमीटेड आवाजात वाजविण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. तसेच परवा अधिविशेनात मुख्यमंञ्याने पण हे जाहीर केले आहे.माञ या आदेशाला सर्रासपणे पायदळी तुडविले जाताना प्रशासन कांहीच का करेना?जर एखाद्याने हा आदेश मोडला तर त्या इसमाला संबंधित कायद्याचा हिसका दाखवितात.आणि भजन-किर्तनाला सुध्दा राञी 10 पर्यंतच परवानगी आहे.असे म्हणणारी यंञणा तसेच त्या यंञणेचे अधिकारी,कर्मचारी या लोकांना लग्नाची वरात व बर्थ डे मध्ये राञी 12 नंतर ही डीजे डाॅल्बी चा दणदणाट ऐकू कसा येईना ? का संबंधितांना "मनी" देऊन डीजेडाॅल्बी चा दणदणाट तर होत नाही,ना ? असे प्रश्न डीजेमुळे वैतागलेले हाळी- हंडरगुळीकर प्रशासनास विचारतात.
*D.J मुळे -हदय-कानांना धोका*
डीजे च्या दणदणाटामुळे -हदयाचे रुग्णांना सर्वाधिक ञास होतो.तसेच -हदयाची धकधक वाढते.तसेच कान दु:खीचा ञास होऊन कानांचे पडदे फाटू शकतात.तसेच लेझर लाईट्स ही डोळ्यांसाठी खतरनाक असते. तसेच गर्भवती महिला,बुर्जूग व्यक्ती व नवजात बालके यांना डीजे चा महाञास होतो.डीजेचा आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे सर्वञ दिसुन आले.माञ येथे डीजे डाॅल्बी मुळे अजुनपर्यंत दुर्देवी घटना घडली नाही.म्हणुनच डीजेवर कारवाही होत नसावी.अशी शंका येते.
*आवाजाचे नियम व पातळी*
डीजे डाॅल्बी च्या आवाजाचे पुढील प्रमाणे नियम आहेत.निवासीभागात ध्वनीची मर्यादा स.६ ते राञी.१० वा. ५५ डेसीबल,रा.१० ते स.६ वा.पर्यंत ४५ डेसिबल हवी.पब्लिक प्लेस ५५ डेसिबल.यासारखे नियम आहेत.व याच्या वापरासाठी परवानगी देणारे पोलीस प्रशासनच नियम मोडणा-या डीजे डाल्बीवर कारवाई करत असते व तसा अधिकार पोलिसांना आहे. तेंव्हा उठसुठ रोज कुणाचा ना कुणा चा बर्थ डे होतो. त्यावेळेस राञी १२ व त्याही पुढे पर्यंत आवाज वाढविना-या डीजेवर पोलिस कारवाई करतील का , डोळेझाक ? याकडे डीजे डाॅल्बीमुळे हैराण,परेशान झालेल्या -हदयरुग्नां सह सामान्य हाळीकरांचे लक्ष आहे . *न्यायालयासह मुख्यमंञ्याचे ही आदेश असल्याने आता यापुढे कांहीही कार्यक्रम असो तसेच वरात यामध्ये लागणा-या डी.जे.च्या आवाजाची नक्की तपासणी करणार आणि आवाज वाढवणा-या डी.जे.मालकावर गुन्हा दाखल करणारचं.! अशी माहिती सपोनी.बी.एस. गायकवाड यांनी दिली आहे*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या