चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर :-शहर पोलिसांनी ठाण्याच्या हद्दीत २२ मार्चला महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये सात प्रकरणांमध्ये सात जणांवर कारवाई करून १५ हजार ९८० रुपयांचा तर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये तीन प्रकरणांमध्ये दहा जणांवर कारवाई करून २७ हजार ८८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहतूक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांनुसार चार हजार ४८९ वाहनचालकांवर कारवाई करून १७ लाख ४७ हजार ६०० रुपये तडजोड शुल्क वसूल केला. ही मोहीम नागपूर शहर पोलिसांतर्फे राबविण्यात आली. यापुढेही प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.


0 टिप्पण्या