Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी महादेव मंदीर परिसर सुशोभीकरणाचा शुभारंभ.....


चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-हंडरगुळी ता.उदगीर येथील श्री.शंभो महादेव मंदीर परिसराचे ग्रामीण पर्यटन क्षेञ विकासाअंतर्गत माजी मंञी,आ.संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुशोभीकरणाच्या कामाचे भुमिजन दि.१२ रोजी संपन्न झाले.
यावेळी सरपंच विजय अंबेकर, उपसरपंच बालाजी भोसलेपाटील, सदस्य सुनिल कांबळे,सदस्य अंकुश अनलदास, माजी सरपंच मगदुम मामा,माजी सदस्य आर.व्ही.माळी, माजी सदस्य संतोष भोसले व्हा. चेअरमन बाबुराव धुप्पे,वि.का..सेवा सोसायटी संचालक संभाजीराव काळवणे,माजी संचालक रामदास भाऊ भोसले.संचालक वसंतराव भोसले,डाॅ. उदयभाऊ भोसले, वैजनाथप्पा शेटकार,विठ्ठलराव सुळे, बाळासाहेब भोसले- पाटील,सचीन मंगनाळे,बस्वराज धुप्पे,बालाजी चिंतलवार,पिंटू गुद्दे, विक्की भोसले, युसूफ शेख,दिपक भोसले,विठ्ठल येरावार यांच्यासह ग्रामस्थं उपस्थीत होते.मंदीर परिसराचे सुशोभीकरण व्हावे,अशी भक्तांची,जनतेची मागणी होती.कारण,*वनवासात असताना प्रभू श्रीरामांनी येथील तिरु नदीत स्नान करुन या नदी पाञातील वाळूने महादेवाची पींड तिरुनदी किनारी तयार केली.व तीचे दर्शन घेतले.तेंव्हा पासून येथे महादेव मंदीर आहे* अशी एक अख्याईका आहे.यामुळे सरपंच विजय अंबेकर, उपसरपंच बालाजी भोसले यांनी सतत शासनदरबारी पाठपुरावा केला आणि मंदीर परिसरात सुशोभीकरण कामाचे भुमीपुजन संपन्न झाले.गत चार वर्षात गल्लोगल्ली झालेला व होत असलेला विकास पाहून आनंद व्यक्त करणारे ग्रामस्थं प्रभू श्रीराम यांच्या हस्ते स्थापन झालेल्या शंभो महादेवमंदीर परिसराचे सुशोभीकरन होणार असल्याने समाधानी दिसतात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या