दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराची सांगता!
चित्रा न्युज प्रतिनिधी
अकोला : चित्ताला सतत नितिमत्तेचे खतपाणी घातल्याशिवाय आदर्श समाज निर्माण करता येवू शकणार नाही. त्यासाठी शीलाचे पालन आणि सेवाभाव असणे गरजेचे असल्याचे वक्तव्य दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामनणेर शिबिराच्या सांगता समारोहाला पूज्य भंते बी.संघपालजी महाथेरो यांनी आपल्या धम्म देसनामध्ये सांगितले.
नुकताच पळसो बढे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने या दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबीर, महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर, समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे. वानखडे नंदकुमारजी डोंगरे, संस्कार विभाग प्रमुख डी. एस. ननिर सर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष आशिष मेश्राम हे होते. या दहा दिवशी शिबिराला प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षक अरूण तायडे गुरुजी भुसावळ, हे उपस्थित होते. या दहा दिवसिय शिबिराचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अकोला, तालुका अकोला पूर्व आणि ग्राम शाखेच्यावतीने करण्यात आले.
एक आदर्श समाज निर्माण होण्याच्या उद्देशाने जिल्ह्यामध्ये बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिर, महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर आणि समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केल्या जाते, जेणेकरून समाजात गुणवान, मानवतावादी पिढी निर्माण व्हावी. आपापसात समता, बंधुत्व निर्माण व्हावे. या उद्देशाने या शिबिरांचे आयोजन केले जाते. तथागत भगवान गौतम बुद्धांचा सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना समानतेची वागणूक देतो, तो विचार घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम या धम्म शिबिराच्या माध्यमातून केल्या केल्या जाते.
या शिबिराला पळसो बढे या गावातील सर्व जाती, धर्माच्या, पंथाच्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला तन, मन, धनाने सहकार्य केले. या श्रामणेर शिबिरामध्ये 59 श्रामणेर प्रशिक्षणार्थ्यांना जवळजवळ 39 धम्मविषयक विषयांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण वरिष्ठ केंद्रीय शिक्षक नंदकुमार डोंगरे, ननीर सर, पंचशील गजघाटे, रवींद्रजी दारोकार गुरुजी, आयुष्यान मेश्राम, जयदेव खंडारे, विलास बावस्कर, दादाराव दाभाडे, सरोज डोंगरे, भाऊसाहेब थोरात यांनी दिले. त्याचप्रमाणे महिला उपासिका धम्म विषयक प्रशिक्षण शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शिका अल्काताई दुपारे चंद्रपूर जिल्हा, केंद्रीय शिक्षका यांचे अधिपत्याखाली महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर ग्राम रामगाव, ग्राम अवन्वी मिर्झापूर, ग्राम दहिगाव, ग्राम ताणखेड, ग्राम मजलापूर दापुरा या गावांमध्ये उपासिका महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली.
यामध्ये केंद्रीय शिक्षिका उषाताई सिरसाट,धुळे जिल्हा, वर्षाताई हिवराळे, करुणाताई साखरकर, वैशालीताई गोटे, सिंधुताई शेगावकर यांनी विविध विषयांवर महिला उपासिका यांना प्रशिक्षण दिले. त्याचप्रमाणे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर जिल्ह्याचे संरक्षण विभागाचे प्रमुख विजयजी हवराळे, मेजर नागेश वाकोडे, मेजर रामचंद्र वाकोडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेची सर्व कार्यकारणी, तालुक्याची कार्यकारणी, गाव पातळीवरील कार्यकरणी प्रामुख्याने हजर होते. या कार्यक्रमाच्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अकोला पूर्व तालुक्याचे अध्यक्ष आशिष मेश्राम आणि त्यांचे सर्व सक्रिय पदाधिकारी, सहकारी मंडळी यांनी शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोठ्या कष्टाने आणि तत्परतेने प्रयत्न केलेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघपाल इंगळे, प्रास्ताविक राहुल भगत यांनी केले. या प्रसंगी नव श्रामणेर यांचे मनोगत, महिला प्रशिक्षणार्थी यांचे मनोगत व केन्द्रीय शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला महिला जिल्हाअध्यक्षा इंदुताई मेश्राम, प्रज्ञाताई इंगळे, वैशालीताई वाहुरवाघ, पंचशील गजघाटे, विलास बावस्कर, राहुल गोटे, गोरखनाथ वानखडे, विलास गवई, माणिकराव इंगळे, तसेच जिल्ह्यातील, तालुका,महानगराचे सर्व भारतीय बौद्ध महासभाचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते, माजी श्रामनेर, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, समता सैनिक दलाचे संपूर्ण पदाधिकारी तसेच पळसो बढे गावातील कार्यकर्ते, उपासक, उपासिका आणि सर्व जाती-धर्माची मंडळी उपस्थित होते.


0 टिप्पण्या