चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे :-साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील मानव केंद्राजवळ जनावरांची अपेरिक्षात कोंबुन अवैधरित्या वाहतुक करतांना पोलीसांनी कारवाई करीत वाहनासह ७० हजारांचा ऐवज ताब्यात घेतला. दाटीवाटीने दोरखंडाने त्यांना त्रास होईल अशा निर्दयीतेने बांधुन कोंबुन वाहतुक करीत असतांना मिळून आली. पोलीसांनी वाहन ताब्यात घेवून जनावरांची सूटका केली. वाहनासह चालकास ताब्यात घेतले. याप्रकरणी पो. कॉ. रविंद्र सुर्यवंशी यांनी पिंपळनेर पोलीसांत दिलेल्या फिर्यादी वरुन संशयीत अपेरिक्षा वाहन चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.


0 टिप्पण्या