शिक्षक शिवाजी माने सर यांच्या अथक प्रयत्नास यश
लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड:-शंकर नगर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी घेण्यात आलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेला 16455 विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण 80 विद्याध्यर्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड झाली आहे. त्यामध्ये
हिमायतनगर तालुक्यातील 2000 विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षेस बसले होते त्यापैकी हिमायतनगर शहरातील नामांकित ज्ञानसाधना कोचिंग क्लासेस येथील तब्बल 9 विद्यार्थी ह्या वर्षीच्या परीक्षेत यशस्वी झाले असल्याचे ज्ञानसाधना कोचिंग क्लासेसचे संचालक श्री शिवाजी माने सर यांच्या कडून सांगण्यात आले आहे ह्या सर्व यशस्वी विद्यार्थांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री शिवाजी माने सर यांचे तालुक्यातील पालक वर्गातून कौतुक होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील नामांकित ज्ञानसाधना कोचिंग क्लासेस या खाजगी क्लासच्या 65 विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थी ह्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी पात्र ठरले असल्याचे ज्ञानसाधना कोचिंग क्लासेस तर्फे सांगण्यात आले यामध्ये प्रशांत पंडित साबळे (हिमायतनगर), स्वरागिनी माधवराव शिंदे (टेंभी), कनिष्क बाबासाहेब मुन्नेश्वर (हिमायतनगर), सोहम राजू गावंडे (कोठा ज.), सम्यक रमेश पाटील (सावळेश्वर), संग्राम विठ्ठल चिलेमोड (हाडोळी), मोक्षा रामदास गडपाळे (कोल्हारी), श्वेता शंकर जाधव (दगडवाडी), लालुप्रसाद सतिष पावडे(मंगरूळ)
ह्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने त्यांचा आता पुढील शिक्षण घेण्यासाठीचा मार्ग मोकळा झाल्याने शहरातील ज्ञानसाधना कोचिंग क्लासेस चे संचालक व मुख्य मार्गदर्शक श्री शिवाजी माने सर ,श्रीकृष्ण माने सर, आस्मिता वानखेडे मॅडम, सौ. सुर्यवंशी मॅडम, श्री राजीव जाधव सर व शिवश्री हाॅस्टेल हिमायतनगरचे संचालक श्री रामभाऊ राठोड यांच्या प्रयत्नास यश आले आहे त्यामुळे त्यांचा येथोचित सन्मान शहरातील पालकांनी केला आहे यावेळी ज्ञानसाधना कोचिंग क्लासेसचे संचालक श्री शिवाजी माने सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की शालेय विद्यार्थ्यांची पुढील काळात उत्तरोत्तर प्रगती व्हावी व नवोदय विद्यालयातून त्यांनी पुढील शिक्षण सी.बी. एस.सी. माध्यमातून शिक्षण घेऊन उत्तरोत्तर प्रगती करावी भविष्यात हे विद्यार्थी उज्वल शिक्षण घेऊन देशात किंव्हा विदेशात मोठ्या पदावर कार्यरत राहणार आहेत, ही संधी म्हणजेच शिक्षणाची पहिली पायरी होय. विद्यार्थी जीवन यातूनच घडून जात असते असे मत शिवाजी माने सर यांनी व्यक्त केले त्यानंतर संचालक श्री शिवाजी माने सर यांनी असे सांगितले की आमच्या क्लासचे विद्यार्थी नक्कीच भविष्यात उच्च शिखरावर पोहचतील असे त्यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितले.
या कार्यक्रमास ज्ञानसाधना कोचिंग क्लासेसचे संचालक श्री शिवाजी माने सर, मार्गदर्शन श्रीकृष्ण माने सर, रामभाऊ राठोड सर, नाथा गंगुलवार सर, गजानन निरटवाड सर , पंडित साबळे साहेब, बाबासाहेब मुन्नेश्वर, परसराम काळे, बंडूजी गायकवाड, सावन रावते, पत्रकार विजय वाठोरे, संजयजी मुन्नेश्वर, लिंगोजी कदम, सिद्दोधन हनवते, परमेश्वर सुर्यवंशी यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
0 टिप्पण्या