सोलापुरात सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसची युती !
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस पार्टीचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोठे आणि इतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत घोषणा केली.
यामध्ये त्यांनी म्हटले की, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या विकासासाठी आम्ही एकत्र येत आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाल्यापासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. भाजपा आमदार विजयकुमार देशमुख आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काका साठे यांनी एकत्र येऊन निवडणुकांमध्ये आपले पॅनल उभा केले आणि सत्तेत राहिले, तसेच याही वर्षी भाजपा आणि काँग्रेस पार्टी एकत्र येऊन निवडणूक लढवत आहे, असा कोणता शेतकऱ्यांचा विकास कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास जो राहिला आहे गेली 30-40 वर्ष काँग्रेसने सत्तेत असून केला नाही, जे आता हे लोक एकत्र येऊन करणार आहे, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे विक्रांत गायकवाड यांनी विचारला आहे.
शेत मालाला हमी भाव दिला नाही, अनेक वेळा शेतकऱ्यांना आपली उत्पादने रोडवर टाकावी लागली शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर दिले नाही. शेतकरी हवाल दिल आहेत.
गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजपचे विजयकुमार देशमुख आणि काँग्रेसच्या मंडळांनी मिळून बाजार समिती आपल्या ताब्यात ठेवली त्यानंतर प्रशासनाच्या ताब्यात गेली.
आता प्रश्न पडतोय भाजपची बी टीम कोण ?
या माध्यमातून जनतेने लक्षात घ्यावी की काँग्रेसला मतदान दिले तर ते उद्या भाजपलाच जाणार आहे, त्यामुळे जनतेने आपला तिसरा पर्याय शोधला पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी केले.


0 टिप्पण्या