Ticker

6/recent/ticker-posts

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा अपप्रचार खपवून घेतला जाणार नाही

दैनिक सामनाचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीची होळी आंदोलन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा परभणीच्या वतीने दैनिक सामना या वृत्तपत्राची होळी करण्यात आली. दैनिक सामनाने आंबेडकरी समाजाविरोधात केलेल्या लिखाणाचा निषेध नोंदवण्यात आला.

या आंदोलनावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, उत्तर जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती, महिला अध्यक्ष सुनीता साळवे, दक्षिण युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, उत्तर युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे, शहर अध्यक्ष रणजित मकरंद, संदीप खाडे, यशवंत सोनवणे, मोहन गाडे, बापूराव मोरे, युसुफ कलीम, मुंजा देवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या