Ticker

6/recent/ticker-posts

सुमेध वाठोरे यांची एमपीएससी मार्फत मुंबई हायकोर्टामध्ये क्लार्क पदी निवड ..

लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड        

नांदेड :-हिमायतनगर  तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील मूळ रहिवासी असलेले संभाजी वाठोरे यांचे जेष्ठ सुपुत्र सुमेध वाठोरे यांची एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेतून त्यांची  मुंबई हायकोर्टामध्ये क्लार्क पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
  सुमेध वाठोरे यांचे प्राथमिक शिक्षण हे साने गुरुजी विद्यालय बिलोली येथे झाले.माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल बिलोली तर उच्च माध्यमिक शिक्षण बारावी व बीएससी पदवी सायन्स कॉलेज नांदेड येथून झालेले आहे. सुमेध वाठोरे यांनी आपल्या मेहनतीने व जिद्दीने एमपीएससी सारख्या खडतर परीक्षेला सामोरे जात अभ्यास करून या पदाला गवसणी घातली आहे. त्यांची एमपीएससी अंतर्गत मुंबई हायकोर्टात क्लार्क पदी निवड झाल्याने से.मु.संभाजी वाठोरे,आई दिक्षा वाठोरे,बेबीनंदा बाबासाहेब सोनवणे,दक्षिण मध्य रेल्वेचे रेल्वे गार्ड कौरव कांबळे,बीएसएफ एसआय राहुल कांबळे,नारायण वाठोरे, चंदू वाठोरे,लता गोपीनाथ हिंगोले,डॉ. संदेश नांदेडकर,प्रकाश वाठोरे, सचिन कांबळे,राजरतन वाठोरे,प्रतीक्षा विजय बगाटे,संघप्रिया राजरतन कवडे,पत्रकार विजय वाठोरे सरसमकर,लंकेश वाठोरे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करत शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या