Ticker

6/recent/ticker-posts

सरकारी नौकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांना लुटणाऱ्या तोतया महसूल सचिवाबरोबर त्याला सहाय्य करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यालाही पुणे पोलिसांनी पकडले


चित्रा न्युज प्रतिनिधी 

पुणे-महाराष्ट्र शासनाचे महसुल, वन विभाग व पोलीस खात्यामध्ये वर्ग १ व वर्ग २ नोकरीचे अमिष दाखवून अनेक नागरीकांना लुटणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखा युनिट २ ने पकडून गजाआड केले आहे. महादेव बाबूराव दराडे वय ३२ वर्ष रा फॅलट क्रमांक ५०५ व्हाईट फिल्ड सोसायटी काळा खडक वाकड,पुणे असे या भामट्याचे नाव आहे. लोकांना तो महसूल सचिव म्हणून त्याची ओळख करुन देत महसुल विभागात सहायक क्लर्क म्हणून काम करणारा रणजीत लक्ष्मण चौरे वय ३५ वर्ष रा. धायरी पुणे हा या तोतयाला गुन्हयात नियुक्तीपत्र बनवून देणे , अन्य कागदपत्रे याबाबत सहाय्य करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यालाही पकडले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रंमाक १०६/२०२५ बी एन एस कलम ३१६/२,३१८,३१९, मधील फिर्यादी रा.मुं पो काष्टी स्टेशन गाव तालुका श्रीगोंदा जि. अहमदनगर याचे तक्रारीवरुन इसम नामे महादेव बाबूराव दराडे वय ३२ वर्ष रा फॅलट क्रमांक ५०५ व्हाईट फिल्ड सोसायटी काळा खडक वाकड पुणे याने तो स्वता महसुल सचिव असल्याचे भासवून सन २०२२ ते २०२५ दरम्यान पुणे शहर व परिसरात पोलीस उप निरीक्षक पदावर नियुक्ती देतो म्हणून विश्वास संपादन करुन १० लाख रु घेवुन फसवणुक केले बाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
हा आरोपी हा रियल इस्टेट एजंट म्हणून काम करीत असताना कामानिमीत्त शासकीय ऑफीसेस मध्ये जाणे येणे असल्याने त्याला शासकीय कामकाज व नोकरी व त्याच्या नियुक्तीबाबत ज्ञान झाल्याने सदर शासकीय कार्यालयातील त्याच्या नियमीतच्या वावराने तेथील येणा-या जाणा-या लोकांना तो महसूल सचिव म्हणून त्याची ओळख करुन देवू लागला त्यामध्ये तो ब-याच लोकांना शासकीय अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग पदावर नियुक्ती व नेमणुका करुन दिली आहेत असे भासवून आरोपीने सन २०२२ ते २०२५ दरम्यान महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील सुमारे २० ते ३० नागरीकांकडून १ लाख रु पासून २० लाख रु. पर्यंत वेगवेगळ्या रक्कमा घेवुन महसुल पोलीस व वन विभागात नोक-या देण्याचे अमिष दाखवून त्यांची फसवणुक केल्याची शक्यता असून त्याचेकडून महाराष्ट्र शासनाचे शिक्क्यांचे वापर करुन लेटर पॅडवर महसुल, पोलीस व वन विभागात विविध उमेदवार यांना नेमणुका बाबत पत्रे ओळखपत्रे, विविध शासनाच्या शिक्यांचे पत्रे, शासकिय चिन्हांचा वापर करुन स्वताचे नावाने शासकिय अधिकारी असल्याचे भासवणा-या डाय-या, शासनाचे सेवापुस्तके, शासनाचे ओळखपत्रे, विविध बँकांचे चेक्स बुक्स व कार्ड शासकिय शिक्के असा दस्ताऐवज हस्तगत करण्यात आलेला आह. यामध्ये अनेक नागरीकांना नोकरीचे अमिष दाखवुन फसवणुक केल्याची शक्यता दिसून येते तसेच सदर गुन्हयाचे तपासामध्ये महसुल विभागात सहायक क्लर्क म्हणून काम करणारे रणजीत लक्ष्मण चौरे वय ३५ वर्ष रा. धायरी पुणे याचा गुन्हयात उमेदवारांची नियुक्तीपत्र बनवून देण्यामध्ये सहभाग असलेबाबत निष्पन्न झाले असून त्यासदेखील ताब्यात घेण्यात आले आहे गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.
अशाप्रकारे वरील दोन्मही आरोपींनी म हाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील नागरिकांना नोकरीचे अमीष दाखवून गंडा घातला असण्याची शक्यता असल्याने त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या