चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर:-उदगीर तालुक्यात सर्वात मोठी बाजार पेठ असलेले व नांदेड-बिदर या राज्यमार्गालगत असलेले हाळी व हंडरगुळी येथील बांधकाम खात्याचा रोड संबंधित P.W.D. खात्याच्या तालुका व जिल्हा अधिका-याच्या दुर्लक्षामुळे वाढत्या अतिक्रमणामुळे दिसेनासा झाल्यामुळे हा रोड चोरीला तर गेला नाही,ना?आणि याबाबत कारवाई करणार कोण?असे प्रश्न जाणकार हाळी-हंडरगुळीकर प्रशासनातील त्या अधिका-यांना विचारत आहेत. उदगीर शहराच्या खालोखाल हाळी- हंडरगुळीतील मार्केट प्रसिध्द आहे.व यामुळे 4 तालुक्यातील मिळून 50 साठ गावातील जनतेचा येथे दैनंदिन वावर असल्याने या रोडवर हजारो लहान-मोठ्या वाहनांसह पदचारी यांची सतत गर्दी असते. पण येथील वाढत्या अतिक्रमणामुळे या रोडवर सतत अपघात होतात.तसेच दि.२८ एप्रिल रोजी सकाळी एक हलकासा,छोटा अपघात झाल्यामुळे हा राज्यमार्ग अपघाती मार्ग बनला आहे.म्हणुन याबद्दल आवाज उठवूनही संबंधित खात्याचे जाणुन-बुजून दुर्लक्ष होत असल्याचे बघून एखादा मोठा अपघात झाल्यावरच पी.डब्ल्यू.डी ची टीम कारवाई करणार का? सा.बां.खात्याची हक्क,मालकी असलेला हा रोड व त्यांची नाली दिसेना. म्हणून हा रोड व नाली चोरीला तर गेली नाही,ना?तसेच याबाबत योग्य ती कारवाई करणार कोण?असे प्रश्न जाणकार हाळी-हंडरगुळीकर सा.बांधकाम खात्याला विचारीत आहेत.
अतिक्रमणाचे खास वैशिष्ठ्य
हाळी-हंडरगुळी गावातुन गेलेल्या नांदेड-बिदर या राज्यमार्गालगत सा. बांधकाम खात्याच्या हक्काच्या /मालकीच्या असलेल्या जागेवरचे सगळे अतिक्रमण कांही वर्षापुर्वी प्रशासनाने काढले होते.तद्नंतर तत्कालीन आयपीएस {सिंघम} पोलीस अधिकारी निकेतन कदम यांनी चाकुरहून टीमसह येऊन सगळे येथील अतिक्रमण काढावयास लावले होते. पण त्यांची बढतीवर बदली झाली. आणि सा.बां. खात्याचे दुर्लक्ष.यामुळे पुन्हा त्याच लोकांनी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केले.त्यात सा.बां.खात्याच्या रोडसह त्यांनी बांधलेली नाली पण गायब झाली नव्हे,नव्हे चोरीला गेली.असे म्हटले जाते.ते चूक नाही.तसेच वाढत चाललेल्या अतिक्रमना- मुळे या राज्यमार्गावर रोज अनेकदा वाहतूकीचा खोळंबा होतो व ट्रॅफीक जॅम.यामुळे येथे रोज छोटछोटे अपघात होतात.२८ एप्रिल रोजी सकाळी अपघात झाला पण प्राणहानी नाही.तरीही याकडे प्रशासन लक्ष देण्याऐवजी अतिक्रमन करणा-यांना पाठीशी घालण्याचे व मोठ्या अपघातास आमंञण देण्याचे "पुण्याचे" काम सा.बां.खात्याकडून होत आहे.असे म्हटले जाते.येथील अतिक्रमणाचे विशेष वैशिष्ठ्य असे की,हाळी-हंडरगुळी येथील सा.बां.खात्याचे नाली व रोड क्राॅस करुन हे अतिक्रमण राज्यमार्गाला टच झाले असल्याने बस थांब्यावर एकही बस थांबत नाही.म्हणुन याविरुध्द अनेक वेळा आवाज उठवुनही सा.बां.खाते याकडे दुर्लक्ष करण्यामागचा "अर्थ" व "कारण" काय..?
*या बाबत लवकरच पाहणी करणार आणि अतिक्रमणधारकांना रितसर नोटीस देणार, अशी माहिती फोन वरुन एल.डी.देवकर उपअभियंता सा.बां. खाते उदगीर यांनी दिली आहे*
0 टिप्पण्या