Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळी परिसरातील गरजू निराधारांना लुटायचा धंदा जोमात ; प्रशासन कोमात...!!


 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर:-एक रुपयात पीक विमा तसेच गरजू निराधार व्यक्तींना पाहिजे ते कागद - पञ काढण्यासाठीचे दरपञक आहे त्यापेक्षाही दुप्पट,चौपट दर बहूतांश आधार केंद्र व ई-सेवा केंद्र चालक घेऊन गरजू निराधारांना लुटायचा धंदा जोमात तर प्रशासन कोमात गेल्याचे दिसून येते.तेंव्हा कोणीतरी तक्रार द्यावी आणि मगच कारवाई करावी,या विचारात तर अधिकारी महाशय नाहीत ना?असा सवाल हळी परिसरातुन उपस्थित होत आहे उदगीर शहर,वाढवणा बू.सह हाळी - हंडरगुळी येथील बहूतांश आधारकेंद्र व आपले सरकार ई-सेवा केंद्रावर गरजू नागरीकांची विविध कागदपञं काढण्यासाठी गर्दी असते.यात सध्या आधार शिवाय कोणतेच काम होत नाही.म्हणुन नसेल आधार तर व्हाल निराधार,असे म्हटले जाते.म्हणुन या सर्व केंद्रावर गरजूंची जञा भरते.व नेमका याचाच फायदा घेऊन गरजू लोकांची दिनदलाडे आर्थिक लुट करणा-यांची एक टोळीच तालुक्यात विशेषत: हाळीहंडरगुळी,वाढवणा बू येथे तयार झाली आहे.आणि प्रत्येक कागदपञांचे दर शासनाने ठरवून दिले असतानाही दुप्पट,चौपट रुपये घेऊन आपली लुट होत आहे.ही बाब शिक्षित,उच्च शिक्षित व खेडूत धोतर वाल्या व्यक्तींना माहिती लक्षात येते. पण आधारलिंक,अपडेट ,मोबाईल लिंक आदी करणे गरजेचे आहे.तसे ते केले नसेलतर शासकीय सुविधा मिळेनात.म्हणुन गुपचूप स्वत:ची लूट करवून घेतात.तर प्रशासन माञ या लुटमारीच्या धंद्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आधार व ई-सेवा केंद्र हे गरजूंना लुटायचे केंद्र बनल्याचे आणि हा प्रकार माहित असूनही सं. अधिकारी हा तमाशाबघत असल्याचे चिञ दिसत आहे.


कारवाई करणारे नाही कोणी ; म्हणुन केंद्रचालकांची मनमानी.!

कांही आधार व बहूतांश आपले सरकार ई-सेवा केंद्रात आजच्या काळात अत्यावश्यक असलेले सर्वच कागदपञं मिळतात.आणि त्या सर्व कागदपञांसाठी सरकारी भाव हा ठरलेला आहे.माञ ठरवुन दिलेल्या भावापेक्षा दुप्पट,तिप्पट ते चौपट दर गरजवंताकडून घेतले जाते,याबद्दल विचारपुस करणारे कोणी नसल्याने केंद्रचालकांची मनमानी वाढली आहे  अत्यावश्यक असलेले कागदपञ हवे त्या वेळेत मिळावेत यासाठी अडले- नडलेले गरजवंत लोकांची नेमकी नड/नस ओळखलेले ई-सेवा केंद्र चालक मंडळी ही गरजवंतांची लूट करत सुटल्याने त्यांचा धंदा जोमात दिसतोय.तसेच कुणी मागत नाहीत म्हणून पावती पण देत नाहीत.

केंद्र चालक आणि गाव वेगळे.!

आधार केंद्र,आपले सरकार ई-सेवा केंद्र चालू करण्यासाठी शासनाची कांही नियमावली आहे.उदा:आय.डी धारकच चालक हवा आणि आय.डी परवाना ज्या गावचा आहे,त्याच गावात केंद्र चालू असालया हवे.पण शासनाचे सर्व नियम,कायदा सर्रास पायदळी तुडविण्याचे महान कार्य या गावातील कांही ई-सेवा केंद्र चालक करत असल्याचे संबंधित अधिकारी महाशयांना माहिती आहे.तरीही या प्रकाराकडे जाणुनबुजून कानाडोळा करत असल्याने बाहेर गावचा सेवा केंद्राचा परवाना असलेले येथे केंद्र सुरु करुन हाळी व हंडरगुळीकर जनतेला लुटण्याचे केंद्र हंडरगुळीत जोमात सुरु आहेत.


केंद्राचा परवाना परगावचा केंद्र थाटले हंडरगुळीत..!

आधार व आपले सरकार सेवा केंद्र ज्याच्या नावे व ज्या गावच्या नावाने मंजूर आहे,त्याच व्यक्तीने त्याच गाव भागात सुरु करणे बंधनकारक आहे. माञ,हंडरगुळीतले सर्व ई-सेवा केंद्र हे परगावचे व चालकही दुसरेच आहे तरीपण गत दिड 2 वर्षापासून येथे हे केंद्र सुरु आहेत.व यातुन गरजवंत लोकांची दिनदहाडे लुट होत आहे.
व हा सगळा प्रकार उघड झालाय ! तरीही तक्रार आल्याशिवाय कांहीच कारवाई करायची नाही.अशी स्पष्ट भुमिका प्रशासनाची असल्याचे समजते.तेंव्हा प्रशासन तक्रार येई पर्यंत वाट बघणार का?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या