चित्रा न्युज प्रतिनिधी
अकोला : अकोला जिल्ह्यात १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नये म्हणून देशी व विदेशी दारू विक्री पूर्णतः बंद ठेवावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अकोला यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, गजानन गवई, चरण इंगळे, संजय कीर्तक, शंकरराव राजुरकर, मनोहर बनसोड, किशोर जामणीक यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या मते, डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी दारू विक्री बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे या दिवशी दारू दुकाने संपूर्ण दिवस व रात्रीसुद्धा बंद ठेवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या