Ticker

6/recent/ticker-posts

अकोटमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद !

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकोट: अकोट तालुका व शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश बोधगया महाविहार कायदा १९४९ रद्द करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी आहे.

या मोहिमेची सुरुवात खानापूर वेस येथील बौद्ध विवाहाराजवळ तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून करण्यात आली. तालुकाध्यक्ष चरण इंगळे आणि महासचिव रोशन पुंडकर यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाला सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ४०० महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

या स्वाक्षरी मोहिमेत तालुकाध्यक्ष चरण इंगळे, महासचिव रोशन पुंडकर, संघटक सुरेंद्र ओईबे, सुरेश गवई, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भटकर, अनिल वानखडे, मिलिंद वानखडे, योगेश आग्रे, सुनीताताई वानखडे, मुरलीधर तेलगोटे, मंदाताई कोल्हे, अर्चनाताई वानखडे, मालाबाई वानखडे, शिलाबाई लबडे, सोनू पोहरकार आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या