चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:-जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ यांच्या वतीने संस्थेच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार सन्मान सोहळा दि. 30 मार्च ला विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृह नागपूर येथे पार पडला.या सोहळ्यात मा. डॉ. प्रकाश करमाडकर ( कुलगुरू आर्यवृत्त आंतराष्ट्रीय विद्यापीठ, त्रिपुरा ) मा.डॉ. राजेश गायकवाड (सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई ) यांच्या हस्ते, भंडारा येथील संगीतकार केशव खोब्रागडे यांना संगीत क्षेत्रातील त्यांच्या संगीत दिग्दर्शन कार्यासाठी *डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगीत रत्न पुरस्काराने* सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर डॉ जगन कराडे समाजशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मा. डॉ विद्याधर बन्सोड सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत चंद्रपूर, मा.डॉ विलास तायडे सुप्रसिद्ध साहित्यिक अकोला, मा डॉ. सुनील रामटेके सुप्रसिद्ध नाटककार व साहित्यिक मुंबई तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिपक कुमार खोब्रागडे उपस्थित होते.
आजवर विविध अल्बम मधील गीतांना केशव यांनी संगीतबद्ध केले असून त्यांनी संगीत दिलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित *सन्मानाचा हिरा* हा भीमबुद्ध गीतांचा अल्बम रसिकाच्या पसंतीस उतरला.ज्यातील गीते प्रख्यात गायक पदमश्री सुरेश वाडकर,आदर्श शिंदे, वैशाली माडे डॉ.नेहा राजपाल, प्रा.अनिल खोब्रागडे यांनी गायली आहेत. नुकताच लहान मुलांसाठी "ताऱ्यांच्या जगात या रे मुलांनो" हा केशव यांनी संगीत दिलेला मराठी बालगीत अल्बम सुमीत Music co.तर्फे पब्लिश होण्याच्या मार्गावर आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर संगीत रत्न पुरस्कार स्वीकारतांना विशेष आनंद झाला तसेच मिळालेला हा पुरस्कार माझ्या आयुष्यातला मोलाचा पुरस्कार आणी प्रेरणादायी आहे असे केशव यांनी सांगितले. सेंट पिटर्स स्कुल बेला येथे संगीत शिक्षक पदावर कार्यरत असलेले केशव यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगीत रत्न पुरस्कार मिळाल्याने विविध क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.


0 टिप्पण्या