Ticker

6/recent/ticker-posts

हिवताप योजनेचे हस्तांतरणास तिव्र विरोध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध आक्रोश निदर्शने

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती:-महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन  कर्मचारी  मध्यवर्ती संघटना जिल्हा अमरावती व  महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मध्यवर्ती संघटना अमरावती चे संयुक्त विद्यमाने  हिवताप योजनेतील अधिकारी व कर्मचार्याच्या सेवा  जिल्हा परिषद यंत्रणेकडील हस्तांतरण रोखण्यासाठी  दि. ०९/०४/२०२५  ला  दुपारी २ ते ५ पर्यंत लक्षवेध आक्रोश निदर्शने  जिल्हाधिकारी कार्यालयाचे समोर करून हस्तांतरण विरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
आंदोलनात हिवताप व हत्तीरोग विभागातील सर्व संवर्गातील आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य निरिक्षक, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी  झाले. आंदोलनामधे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष डी. एस.पवार यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनामधे सरचिटणीस श्री पी. यु. गिरी,,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी श्री एस जी गवई ,गोवर्धन राठोड, मनोज वरकंठे, व्ही.एम.तोंडरे एस.डी.कपाळे,  मनोज कुमरे, शिल्पा शिर्के, जि. प. कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष पी. टी. गावंडे , हिवताप कर्मचारी संघटनेचे पी.एन. दातीर, डी. व्ही.देशमुख, एस. सी. माणिकपुरे यांनी मार्गदर्शन केले. 
श्री.डी.एस.पवार यांनी हिवताप योजनेचे २००६ व २०१९ मधे सुद्धा  हस्तांतरणाचे हत्यार शासनाने ऊगारले होते. पण  हिवताप विभागातील अधिकारी व कर्मचार्यांचे प्रखर विरोधामुळे  सदरची अंमलबजावणी शासनाला स्थगित करावी लागली हे संघ शक्तीला मिळालेले यश होते. आजच्या आंदोलनामधे राज्यातील सर्व  जिल्हामधुन अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंस्फुर्तीने  लक्षवेध आक्रोश निदर्शने  आंदोलनामधे सहभागी होवून आपला रोष व्यक्त केला आहे .त्यामुळे या संघशक्तीचे ताकदीवर परत ६ वर्षापुर्वी  स्थगित केलेले हस्तांतरणाची प्रक्रिया पुन्हा स्थगित केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही.असे प्रखर मत व्यक्त केले. या हस्तांतरण प्रक्रियेमुळे हिवताप यंत्रणेतील अधिकारी व कर्मचार्यावर होणारा अन्याय   खपवून घेतला जाणार नाही.त्यासाठी या संघटनेचे नेतृत्वाखाली  प्राथमिक स्वरुपाचे लक्षवेध आक्रोश निदर्शने  आंदोलनाने सुरूवात झाली आहे .या आंदोलनाची  वेळीच दखल घेऊन शासन व प्रशासनाने हस्तांतरणाची कार्यवाही त्वरित थांबविण्यात यावी अन्यथा भविष्यात  तिव्र  आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही  आजच्या  आक्रोश निदर्शने आंदोलनामध्ये  देण्यात आला.आजच्या आंदोलनामधे अधिकारी व कर्मचारी  मोठ्या संख्येने सहभागी झाले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. भविष्यातील आंदोलनामधे लढा देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही करण्यात आले. तसेच बायोमेट्रिक फेस रिंडिंग मस्टरलाही आजच्या आंदोलनामधे विरोध दर्शविण्यात आला. 
 हिवताप योजनेचे जिल्हा परिषद यंत्रणेकडे हस्तांतरणाची अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक २६ मार्च २५ रोजी चे पत्रकानुसार दिलेले निर्देश स्थगित करण्यात यावे याबाबतचे मा. मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य मुंबई  यांना  मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत  निवेदन  देण्यात आले..  मा. जिल्हाधिकारी यांनी सदरचे निवेदन तातडीने शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन संघटनेला दिले आहे.- 
या आंदोलनामधे तालुका अध्यक्ष व प्रतिनिधी:-  *एस व्ही जयस्वाल, भाष्कर रिठे, पी.ओ.लुंगे, बाळासाहेब तराळ, पी. एन.दातीर, सचिन गायकवाड, संदीप लांडे,सी.जी.खंडारे,शंकर हरळ,विनय उल्हे,बाळकृष्ण तायडे, रामेश्वर नागपूरकर, प्रकाश मंगळे, एस एस वाडीकर, विजय साळुंके, प्रमोद भावेकर ,किशोर बकाले,हेमंत सोळंके, भारत ढोमणे , ए. डब्ल्यू संभे, आर. एस शिंगोकर,  ,शेख हैदर अली ,निवेदिता झटाळे कार्याध्यक्ष, आशिष नंदेश्वर श्रुती सव्वालाखे, निखिल कोते, वर्षा कांबळे, मनीषा निंबोरकर, आशिष कांडलकर, श्रीकांत मुंदेकर, पूजा मते,  यु. ई. खोडपे,बी एस वावरे, डॉ.जुनेद व ईतर २०० कर्मचारी या आंदोलनामधे सहभागी झाले असल्याचे सरचिटणीस श्री. डी. एस. पवार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या