Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला पंचायत समिती कामकाजाचा अनुभव



100 दिवस कृती आराखड्यातंर्गत

चित्रा न्युज प्रतिनिधी 
धुळे : -शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेतील इयत्ता 6 वी ते 7 वी तील विद्यार्थ्यांना पंचायत राज बाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी एक दिवसीय क्षेत्र भेटीचा कार्यक्रम घेण्यात आला. 

यामध्ये पंचायत समिती मधील सर्व विभागांना या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाजाबाबत माहिती करून घेतली. तसेच त्या विद्यार्थ्यांमधीलच सभापती, उपसभापती, गट विकास अधिकारी यांची निवड करून पंचायत समिती सर्वसाधारण सभा घेण्यात आली व त्यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. तसेच त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाविषयी सर्व माहिती देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, कॉन्फरन्स हॉल याचाही अनुभव या विद्यार्थ्यांना मिळाला तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.

या क्षेत्रभेटीमुळे आम्हाला एक वेगळा अनुभव आला. हा आमच्यासाठी जीवनात खूप महत्वाचा अनुभव असेल असे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी गणेश चौधरी, गट विकास अधिकारी, विठ्ठल घुगे, गटशिक्षणाधिकारी, डॉ. मनीष पाटील, वैद्यकीय अधिकारी , दीपक बांगर, उपअभियंता, सुजाता बोरसे, विस्तार अधिकारी, सुरेश मांडे, डि.के सोनवणे, पंचायत समिती, धुळे यांनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या