Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा ज्योतिबा फुले जयंती प्रसंगी दाखविले सामाजिक दायित्व .


चित्रा न्युज प्रतिनिधी  
भद्रावती : दि.११ एप्रिल रोजी चुटकी बहुउद्देशीय विकास संस्था भद्रावती तर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती सोहळा मोठ्या उत्सवात स्थानिक कर्मवीर विद्यालय गवराळा इथे साजरा करण्यात आला. 

    याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा रोटरियन अब्बास अजानी, हनुमान घोटेकर यांच्या सहयोगाने मा.ठाणेदार लता वाढिवे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, CTV चे प्रतिनिधी जावेद शेख, पत्रकार तथा अखिल कुणबी महासंघ चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष अतुल कोल्हे, जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार पी.जी.टोंगे, सोयाम मेजर, राधाताई कोल्हे, प्रभाकर निमकर, बाबा तराळे, यांचे उपस्थितीत दिव्यांग सोनाली आव्हाड यांना स्वयंचलित सायकल प्रदान करून तसेच चुटकी बहुउद्देशीय संस्था भद्रावती तर्फे गरजूंना वस्त्र वाटप व विद्यार्थ्यांना पेन व चॉकलेट वितरण करून सामाजिक दायित्वाचा परिचय दिला.

       याप्रसंगी ठाणेदार लता वाढिवे मॅडम यांनी  मनोगतातून विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन केले. 

यावेळी संस्था अध्यक्ष लिमेश माणूसमारे यांनी वंदा वा निंदा मात्र विद्यार्थी हित व समाजहिताचा वसा कायम ठेवू असे यांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुनिल वैद्य तर आभार प्रदर्शन शरद राजूरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेषतः श्री रामनवमी उत्सव समिती, गोंडवाना टायगर्स, नवदुर्गा उत्सव मंडळ अहिल्यादेवी होळकर मित्र मंडळ, रेल्वे दुर्गा मंडळ, बचत गट महिला मंडळ, निपॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, व जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ यांनी सहकार्य केले. उपस्थिताना मसालेभात वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या