Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा पो.स्टे.मधील बेवारस मोटार सायकलचा १२ एप्रिल रोजी जाहीर लिलाव....

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर:-उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. पोलीस स्टेशन मध्ये विविध प्रकरणा मध्ये जमा असलेल्या मोटारसायकल  संबंधितांनी ओळख पटवुन घेऊन जाण्याचे जाहीर आवाहन करुनही याला कुणीच प्रतिसाद दिला नाही. म्हणुन आता दि.१२-४-२५ रोजी स. १०-३० वा.पोलीस ठाणे वाढवणा येथे बेवारसावस्थेतील वाहनांचा जाहीर लिलाव होणार आहे.अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक लातुर यांच्या कार्यालयाने दिलीय. याबाबत थोडक्यात असे की,बेवारस व गुन्ह्यातील जप्त केलेल्या मोटार सायकल या ठाण्याच्या आवारात सडून जात आहेत.म्हणुन या गाड्या ओळख पटवुन घेऊन जाण्याचे स. पो.नि.बी.एस.गायकवाड यांनी आवाहन केले होते.पण याला कुणी ही प्रतिसाद दिला नसल्याने आता या गाड्यांचा जाहीर लिलाव जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयाने दिलेवरुन या लिलावात भाग घेऊ इच्छिणा-यांनी दि.११ एप्रिल रोजी ५ वा.पर्यंत स्क्रैप दुकानच्या परवान्या— सह डिपाॅझीट १० हजार वाढवणा ठाण्यात जमा करावी.हा लिलाव बोली पध्दतीने होऊन जास्तीची बोली लावणा-या सदर बाईक /गाडी स्क्रैप करुन घेऊन जावी लागेल.यात सहभागी दुकाणदाराची लिलावापुर्वी ठेवलेली डिपाॅझीट लिलावानंतर परत केली जाईल.लिलाव प्रक्रियेचा अंतीम अधिकार हा वाढवणा प्रभारी पो.अधिकारी यांच्याकडे असेल.ज्या वाहनांचा लिलाव होणार आहे,अशा वाहनांची यादी ठाण्याच्या बोर्डावर लावण्यात आली आहे.तसेच ज्यांचे- जवळ सदर वाहनांचे मालकीहक्का बद्दलचे कागदपञे आहेत.त्यांनी पो. ठाण्याशी संपर्क साधुन ११एप्रिल२५  पर्यंत सदर वाहन घेऊन जावे.यानंतर आलेल्या आक्षेपांचा किंवा अर्जाचा विचार केला जाणार नाही.याची नोंद घ्यावी.अधिक माहितीसाठी सपोनि. भिमराव गायकवाड यांचेशी संपर्क {९८२३७०७९८८} साधावा.असे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालया तर्फे दिलेल्या पञात म्हटले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या