Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाशी एकनिष्ठतेचा संकल्प !

चित्रा न्युज प्रतिनिधी 
औरंगाबाद : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आदिवासी विद्यार्थ्यांसह साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित आदिवासी विद्यार्थ्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील चळवळीशी एकनिष्ठ राहण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमात सम्यकचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना सामाजिक समतेच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विशाल पावरा, संदीप बोडखे, राहुल बिलपे, वीरू पाडवी, दीपक शेळके, गौतम साळवे यांच्यासह शेकडो आदिवासी विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या उपक्रमाद्वारे सम्यक विद्यार्थी आंदोलनाने डॉ. आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या