चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चैत्यभूमी, दादर येथे जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी समाज परिवर्तनाच्या दिशेने कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
ट्विटरवर त्यांनी लिहिले, "आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे जाऊन त्यांना अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतांना आपण सर्वांनी निश्चय केला पाहिजे की, बाबासाहेबांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्य त्यांच्या विचारांवर आधारित पुढे घेऊन जाऊ!"
या अभिवादनाद्वारे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्य पुढे नेण्याचा संदेश दिला.
0 टिप्पण्या