चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त प्रा. डॉ. राजाभाऊ विनायक भैलुमे यांचे प्रबोधनपर जाहीर व्याख्यान वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
भैलुमे सर यांनी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा इतिहास सांगताना 44 वर्षे राज्य, 84 हजार बुद्ध विहार, 42 देशात बुद्ध पोहचवला यांच्या सह गौतम बुद्ध ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंत बुद्धधम्म प्रवासाच्या अनेक गोष्टींचा प्रभावी मांडणी करत इतिहासाचा उजाळा दिला.
प्रमुख पाहुणे म्हणून मौलवी बागवान, सचिन सरोदे , पर्वती विधानसभा अध्यक्ष रवींद्र गायकवाड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर आल्हाट यांनी केले, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख संदीप चौधरी यांनी केले. तसेच पुणे शहर उपाध्यक्ष जीवन रोकडे यांनी आभार मांडले.
यावेळी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष दादा आल्हाट, खडकवासला विधानसभा अध्यक्ष मधुकर दुपारगुडे, खडकवासला युवा अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष प्रभाकर सरोदे , युवा संघटक धम्मपाल बनसोडे, गौतम तायडे, अरुण इंगळे , तौसिफ़ पठाण , राजू वनशिव , पांडुरंग वनशिव,अरविंद कांबळे, धनाजी भोसले,राजु जावळे,विजय वनशिव,सलमान शेख,राहूल दहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या