चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :- टेंभुर्णी शहरातील सुरळी रोडवरील सिद्धीविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी एक होंडा ट्विस्टर मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी १६ एप्रिलच्या रात्री १० वाजेच्या सुमारास ते १७ एप्रिलच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
फिर्यादी तारीक अर्जुल अनवर (वय २६, रा. सेताब तोळा, ता. उत्तर चंदिपूर, जि. मालदा, पश्चिम बंगाल; सध्या रा. सुरळी रोड, सिद्धीविनायक अपार्टमेंट, टेंभुर्णी) हे विहान अॅग्रो एक्सपोर्ट कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. कंपनीकडून त्यांच्याकडे कामकाजासाठी होंडा ट्विस्टर मॉडेलची मोटारसायकल (क्र. MH12 HG 8061) दिली होती.
१६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ते मोटारसायकल घेऊन करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथे केळीच्या बागेची पाहणी करण्यासाठी गेले होते. संध्याकाळी ८ वाजता ते परत टेंभुर्णीतील आपल्या राहत्या जागी आले. नेहमीप्रमाणे त्यांनी मोटारसायकल अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावली व रात्री १० वाजता जेवण करून झोपले.
परंतु, दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पार्किंगमध्ये पाहणी करताना त्यांना मोटारसायकल दिसून आली नाही. त्यांनी अपार्टमेंट परिसरासह टेंभुर्णी गावात विविध ठिकाणी शोधाशोध केली, मात्र मोटारसायकल कुठेही सापडली नाही. अखेर मोटारसायकल चोरीला गेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चोरीस गेलेली मोटारसायकल काळ्या रंगाची असून, होंडा कंपनीची ट्विस्टर मॉडेल आहे. तिचा आर.टी.ओ क्रमांक MH12 HG 8061, इंजिन नंबर JC47E2001562 आणि चेसिस नंबर ME4JC476EB8000581 असा आहे. अंदाजे किंमत १५,०००/- रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराने दिलेला फिर्यादी जबाब त्यांचे मित्र गणेश बलभीम पाटील (रा. अकोले खुर्द, ता. माढा) यांनी संगणकावर टाईप करून वाचून दाखवला असून, तक्रारदाराने त्यास मान्यता दिली आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास टेंभुर्णी पोलीस करीत आहेत.


0 टिप्पण्या