चित्रा न्युज प्रतिनिधी
कोल्हापूर:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कोल्हापूर चा जिल्हा प्रेरणा मेळावा दिनांक - 6 एप्रिल, 2025 रोजी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्था, देवकर पानंद, कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात निशांत शिंदे व सहकारी यांनी चळवळीची गाणी गाऊन केली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी आपली ओळख करून दिली. यावेळी प्रथम सत्राचे सूत्रसंचालन श्रद्धा यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बी. एम. हिर्डेकर व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे प्रधान सचिव श्री. संजय बनसोडे यांच्या हस्ते महाराष्ट्र अनिस चे काम ज्या विविध विभागातून चालते त्या नावांच्या पट्ट्या ओपन करून करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
रेश्मा खाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात मागील दोन वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात सर्व शाखेकडून विविध विभागामार्फत जे काम केले त्याचा आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा अधिक कार्यक्रम झाल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये 30 पेक्षा जास्त संवाद सत्र, 9 महाविद्यालयामध्ये विवेक वाहिनी, सांस्कृतिक विभागाकडून पथनाट्य,रिंगण, बतावणी याचे झालेले प्रयोग, कवी संमेलन, दिवाळी पहाट, युवा संवाद, समता दिंडी, जोविनी कार्यशाळा अशा कार्यक्रमांची यादी वाचून दाखविली. हे सांगत असताना वेगवेगळ्या पातळीवर सर्वांना सोबत घेऊन काम केल्याचे त्यांनी विषद केले.
संजय बनसोडे सरांनी आपल्या बीज भाषणात, कोल्हापूर जिल्हा हा विवेकाचा वारसा चालवणारा जिल्हा आहे असे सांगून हा वारसा पुढे घेऊन जाणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कोल्हापुरातील झालेल्या उपक्रमांची दखल यापूर्वी राज्य आणि देश पातळीवर देखील घेतल्याचे नमूद केले. सांस्कृतिक अंगाने ही चळवळ पुढे जाणे गरजेचे आहे असे सांगत असतानाच कार्यकर्त्यांनी प्राध्यान्य क्रमाने हे काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. चळवळीत येणारा व्यक्ती देव, धर्म, जात विसरून जातो. विवेकाचा संसर्ग जेवढा जास्त देऊ तेवढी संघटना जास्त वाढेल. मानवी संबंधाचा वापर करून ही चळवळ अधिक पुढे नेली पाहिजे. संपूर्ण समाज बदलायला न जाता एक एक माणूस बदलला पाहिजे यासाठी तुमचे साधन फक्त विचार आहे. विचार रुजविण्यासाठी आपण सतत बोलत राहिले पाहिजे, सतत सांगत राहिलं पाहिजे असा संकल्प सर्वांनी करणे गरजेचे आहे. राजकीय व्यक्तींशी चांगले संबंध ठेवा काम विस्तारताना मानवी संबंध चांगले असणे गरजेचे आहे. त्यासाठी स्मार्ट वर्क गरजेचे आहे. कामाचे प्लॅनिंग करून नियोजनबद्ध काम करा व त्यासाठी आपण प्रत्येकाने योगदान देण्याची गरज बोलून दाखवली. आपली कौशल्य वाढवूया. ज्या ज्या जिल्ह्यात कार्याध्यक्ष आणि प्रधान सचिव हे ऍक्टिव्ह आहेत तो जिल्हा कामात नेहमी अग्रेसर असल्याचे सांगितले. यासाठी सर्वांनी पदाधिकारी होण्यासाठी व त्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. बी. एम. हिर्डेकर सर यांनी चळवळीत आपण बदलतोय आणि समाजालाही बदलतोय हे अतिशय महत्त्वाचं आहे असे सांगितले. माणसाला लॉजिकली समजून सांगता आलं पाहिजे यासाठी कार्यकर्ता डेव्हलप झाला पाहिजे. कार्यकर्त्याने सतत शिकत राहिली पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी केले.
दुसऱ्या सत्रात मानसी ने सूत्रसंचालन केले. जिल्हा कार्यकारणी निवड प्रक्रिया, सूचना व जबाबदारी याबाबत कृष्णात स्वाती यांनी मार्गदर्शन केले. पदाधिकारी निवडीसाठी सर्वांकडून स्वेच्छा व शिफारसी फॉर्म भरून घेण्यात आले. राज्याचे निरीक्षक संजय बनसोडे यांच्या निरीक्षणात सर्व फॉर्म ची छाननी करून सर्वसंमतीने नूतन जिल्हा कार्यकारणी निवड जाहीर करण्यात आली. निवड यादी पुढीलप्रमाणे -
*अध्यक्ष* - डॉ बी एम हिर्डेकर
*उपाध्यक्ष* - प्राचार्य डॉ प्रवीण चौगले, प्रा डॉ. अर्चना जगतकर, चंद्रकांत निकाडे
*कार्याध्यक्ष* - हरी आवळे (कागल)
*प्रधान सचिव* - प्रमोद शिंदे (करवीर), अमृता जाधव (राधानगरी), प्रा प्रकाश नाईक (शाहूवाडी)
*बुवाबाजी विरोधी संघर्ष विभाग* - भीमराव कांबळे (मुरगूड), दिलीप कांबळे(करवीर)
*विविध उपक्रम विभाग* - राहुल गीता संभाजी सुतार (करवीर)
*वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग* - विनायक सुनीता अशोक माळी (शिरोळ), प्रशांत मगदूम (चंदगड)
*महिला सहभाग विभाग* - गीता पोतदार (आजरा)
*युवा सहभाग विभाग* - महेश ओलेकर (कोल्हापूर), अंशुमन सुळगावकर (कागल) @ANIS Anshuman Sulagaonkar
*जाती अंत संकल्प विभाग* - हर्षल जाधव (राधानगरी)
*प्रशिक्षण व्यवस्थापन विभाग* - निशांत सुनंदा विश्वास (करवीर)
*विवेक जागर प्रकाशन व वितरण विभाग* - अनिकेत विश्रांती मच्छिंद्र कांबळे (कोल्हापूर)
*अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विभाग* - अमरसिंह शिंदे(भुदरगड), मोहसीन मोमीन (कोल्हापूर)
*मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग*- तुषार चोपडे (पन्हाळा)
*विज्ञान बोध वाहिनी विभाग* - राजाराम ठाकरे (पन्हाळा)
*सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग*- कपिल मुळे (कोल्हापूर), निशिगंधा नलवडे (करवीर)
*सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग* - शिवाप्पा पाटील (शाहुवाडी)
*कायदेविषयक व्यवस्थापन विभाग* - ॲड. रविराज बिर्जे (करवीर), ॲड. अभिषेक मिठारी कोल्हापूर
*व्यसन प्रबोधन व संघर्ष विभाग* -
अमोल वडर (शिरोळ)
*विवेकवाहिनी कार्यकारी मंडळ* -
प्रा डॉ चैत्रा राजज्ञा (दि न्यू कॉलेज कोल्हापूर) प्रा डॉ संध्या माने (शांताबाई चंद्रप्पा शेंडुरे महाविद्यालय, हुपरी) प्रा डॉ विभावरी मालेकर (भोगावती महाविद्यालय, कुरुकली) प्रा डॉ शरद गायकवाड (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर) प्रा शिवाजी जाधव (श्री शहाजी महाविद्यालय, कोल्हापूर) प्रा लखन भोगम (डी आर माने महाविद्यालय, कागल) प्रा. पांडुरंग फराकटे (सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड)
निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्रवीण चौगुले व जगदीश काबरे यांच्या हस्ते करण्यात आला. नूतन कार्याध्यक्ष हरी आवळे, प्रधान सचिव प्रकाश नाईक, अमृता जाधव, प्रमोद शिंदे व कपिल मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व इथून पुढे अधिक जोमाने काम करण्याचे जाहीर केले. शेवटी जिल्हाध्यक्ष बी.एम. हिर्डेकर यांनी सर्वांचे अभिनंदन करून सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सर्वांनी नेहमी आपल्या कामाचं स्वतःचं ऑडिट करत राहिलं पाहिजे व संघटित म्हणून काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्यातील विविध शाखेतील 70 पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी हम होंगे कामयाब या गीताने प्रेरणा मेळाव्याची सांगता करण्यात आली.
विवेकाचा आवाज बुलंद करूया ✊🏼


0 टिप्पण्या