चित्रा न्युज प्रतिनिधी
ठाणे :-पत्रकार आणि पत्रकारितेच्या सन्मानार्थ कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे २३ एप्रिल २०२५ रोजी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ‘पत्रकार सन्मान सोहळा २०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार हे लोकशाहीचे चौथा स्तंभ मानले जातात. समाजात काय घडते, जनतेचे हित कशात आहे, प्रशासनावर लोकनियंत्रण कसे राहील - यासाठी पत्रकार सतत झटत असतात. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत, धोके पत्करून ते सत्य जनतेपुढे आणतात. त्यांची भूमिका केवळ बातम्या देणाऱ्या व्यक्तीपुरती मर्यादित नसून, ती एक जबाबदारीची आणि सामाजिक जाणीवेतून चालणारी असते. त्यामुळे पत्रकारांचा सार्वजनिकरीत्या सन्मान करणे म्हणजे लोकशाहीतील त्यांचं महत्त्व अधोरेखित करणं होय. अशा सन्मान सोहळ्यांमधून त्यांचं मनोबल उंचावते आणि सामाजिक भान असलेल्या पत्रकारितेला प्रोत्साहन मिळते. यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, आमदार संजय केळकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार सौ. सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, आमदार महेश चौगुले, आमदार रईस शेख, आमदार शांताराम मोरे, आमदार कुमार आयलानी, आमदार बालाजी किणीकर, आमदार दौलत दरोडा, ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, माजी खासदार राजन विचारे आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संदीप काळे हे मार्गदर्शन करणार असून जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, शिवव्याख्याते भगवान जाधव यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, सिव्हिल हॉस्पिटल सर्जन कैलाश पवार, व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, विजय चौरडिया सरचिटणीस दिगंबर महाले, कोकण विभाग अध्यक्ष अरुण ठोंबरे, सचिव रंगनाथ तांगडी यांच्यासह संघटनेतील अनेक मान्यवर पदाधिकारी, सल्लागार यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असेल.
ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. मंगल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा संपन्न होत असून महिला विंग जिल्हाध्यक्ष सारिका शिंदे, डिजिटल विंग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष संतोष चव्हाण, तसेच ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदित्य भानुशाली, मच्छिंद्र कांबळे, राजेश भांगे, नरेश जाधव, सरचिटणीस शरद घुडे, संदीप पष्टे, कार्याध्यक्ष फारूक मेमन, अविनाश जाधव, जाफर वणू, यांच्यासह भिवंडी तालुकाध्यक्ष अशोक पाटोळे, कल्याण तालुकाध्यक्ष जगदीश खंबाळे, शहापूर तालुकाध्यक्ष राजेश जागरे, मुरबाड तालुकाध्यक्ष श्याम भाऊ राऊत, ठाणे शहराध्यक्ष भुजंगराव सोनकांबळे, भिवंडी शहराध्यक्ष मोहन राठोड कल्याण शहराध्यक्ष संभाजी मोरे या कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभागी आहेत.
“लढा पत्रकार आणि पत्रकारितेसाठींचा” या ब्रीदवाक्याने सजलेला हा सोहळा ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी गौरवाचा क्षण ठरणार आहे. विविध माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचा सन्मान, मार्गदर्शनपर सत्रे व सामाजिक उत्तरदायित्वावर आधारित चर्चासत्रे यामध्ये सादर होणार आहेत.


0 टिप्पण्या