Ticker

6/recent/ticker-posts

घरकुल लाभार्थ्यांनो सावधान !कोणत्याही अनोळखी व्यक्तींना OTP देवू नका !

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :- शासनाने प्रधानमंत्री आवास योजनें अतर्गत तसेच आर्थिकदृट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी सक्षम प्राधिकारी यांनी सादर केलेली यादी संबंधित तहसीलदार यांनी वाळू डेपोतून पाच ब्रास वाळु स्वामीत्वधन न आकारता विनामुल्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. 
 त्यानूसार लाखनी तालुक्यातील वाकल येथील वाळू डेपो मधून 5 ब्रास पर्यंत विनामुल्य वाळू घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. याकरीता गट विकास अधिकारी लाखनी यांनी सादर केलेली यादीनूसार तहसील कार्यालयामार्फत 2530 घरकुल लाभार्थ्यांची नावे महाखनिज या संघणक प्रणालीवर नोंद घेण्यात आलेली आहे. महाखनिज प्रणालीवर लाभार्थ्यांची नोंद विनामुल्य घेण्यात येते. नोंद घेतलेल्या घरकुल लाभार्थ्यापैकी 570 घरकुल लाभार्थ्यांनी 2772 ब्रास बुकींग केली आहे. व त्यापैकी 1015 ब्रास वाळू उचल केलेली आहे.
 वाळू वाहतुकीकरीता “महाखनिज” या संगणक प्रणालीचा वापर करण्यात येते. या संघणक प्रणालीमध्ये घरकुल लाभार्थ्यांची नोंद विनामुल्य घेण्यात येते. व अधिकृत सेतू केंद्रामार्फत वाळू बुकींग करण्यात येते. ही सेवा तहसील कार्यालयातील सेतू मध्ये विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 
 वाळू बुकींग करतांना संबंधित लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांकावर OTP (One Time Password) नूसार बुकींग करण्यात येते. तरी सर्व लोकांना सुचीत करण्यात येते की, घरकुल लाभार्थ्यांनी अज्ञात व्यक्तींना आपला OTP (One Time Password) देवू नये. व याबाबत गैरप्रकार किंवा फसवणूक झाल्यास संबंधित व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल,असे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी कळवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या